शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका, US न्यायालयानं टॅरिफ निर्णय ठरवला अवैध; काय म्हणाले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष?
2
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस, सरकार काय तोडगा काढणार?
3
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
4
VIDEO: फुल्ल ऑन राडा... नितीश राणाला भिडला दिग्वेश राठी, खेळाडू मध्ये पडले म्हणून नाहीतर...
5
​बीडजवळ काळ बनून आला ट्रक; भीषण अपघातात ६ भाविकांचा जागीच मृत्यू
6
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
7
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
8
पूजा कमी नौटंकीच जास्त! गणपतीसमोर पार्टीत नाचतात तसे नाचले, अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले
9
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
10
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
11
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
12
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
13
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
14
मुसळधारेतही आंदोलकांचा उत्साह कायम, शहर, उपनगरात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी; रात्री उशिरापर्यंत आझाद मैदानात गर्दी
15
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
16
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
17
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
18
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
19
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
20
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!

कर्जत रेल्वे स्थानकातील काढलेले पत्रे बसविले

By admin | Updated: January 30, 2017 02:08 IST

येथील रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पूर्वी फलाट क्रमांक एकवरील पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यात आले होते. परंतु काढलेले सर्वच पत्रे परत

कर्जत : येथील रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पूर्वी फलाट क्रमांक एकवरील पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यात आले होते. परंतु काढलेले सर्वच पत्रे परत न बसविल्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना पावसाचे फटके आणि उन्हाळ्यात उन्हाचे चटके खात उभे राहावे लागत असे. याबाबत रेल्वे प्रश्नाविषयी गेली कित्येक वर्षे सातत्याने आवाज उठवणारे, तसेच एखादा विषय हाती घेतल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा करण्यासाठी प्रसिध्द असलेले व सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी याबाबतीत कर्जत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. काम पूर्ण न केल्यास कर्जत रेल्वे स्थानकात धरणे किंवा रेल्वे रोकोसारखे प्रकार करावे लागतील, असे ओसवाल यांनी कर्जत रेल्वे प्रशासनास कळविले होते.ओसवाल यांनी निवेदनाची प्रत कर्जत येथील जीआरपी व आरपीएफ यांना सुद्धा दिली असल्याने व पंकज ओसवाल यांच्या पत्राने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील जीआरपीने त्वरित पंकज ओसवाल यांच्याशी संपर्कसाधून ओसवाल यांना विनंती करून तातडीने कर्जत रेल्वे स्थानकाच्या जीआरपीच्या केबिनमध्ये २९ आॅगस्ट २०१६ ला बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला कर्जत रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर, जीआरपी,आरपीएफचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी पत्रे बसविण्यासाठी मेगा ब्लॉक घ्यावा लागेल असे पंकज ओसवाल यांना सांगण्यात आले. या बैठकीत बरीच चर्चा झाल्यानंतर पंकज ओसवाल यांनी तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते तुम्ही मला लेखी कळवा असाच आग्रह धरला होता व तसे न केल्यास आपण आपल्या परीने निर्णय घेऊ व त्याची पूर्णपणे जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच राहील असे लेखी स्वरूपात पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास दिले होते.एक महिना उलटून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबतीत काहीच हालचाल करीत नसल्याने पुन्हा पंकज ओसवाल यांनी सर्वांना स्मरण पत्र पाठविले असताना सुद्धा या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने ओसवाल यांनी शेवटी याबाबतीत झालेल्या सर्वच प्रकाराची माहिती कागदपत्रांसह दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाकडे सादर केली. नंतर मुंबई येथील डीआरएमच्या कार्यालयातून पंकज ओसवाल यांना पत्र पाठविले असून तुमच्या मागणीची त्वरित दखल घेऊ व तुम्ही रेल्वे रोको वगैरे असे करू नका अशी विनंती या पत्रात केली आहे. पंकज ओसवाल यांना मुंबईच्या कार्यालयातून पत्र मिळाल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीतच फलाट क्रमांक एकवर पत्रे बसविण्यात आले आहेत. (वार्ताहर)