शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा होर्डिंगकडे पालिकेची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:26 IST

पनवेल महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर फलक लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर फलक लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मात्र यावर कारवाई करण्यास पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पनवेल महापालिका स्थापन होऊन २७ महिने उलटून गेले आहेत. यादरम्यान केवळ एकावरच शहराचे विद्रूपीकरण केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. यावरून पालिकेचे अधिकारी बेकायदेशीर फलक लावणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात उदासीन असल्याचे दिसत आहे.पनवेल पालिकेच्या हद्दीमध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, कामोठे, खारघर व अन्य गावांचा समावेश होतो. सद्यस्थितीत महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात नववर्षाचे, तसेच होऊन गेलेल्या सणांचे फलक मोठ्या प्रमाणात लावलेले दिसून येत आहेत. मात्र पनवेल पालिका बेकायदेशीर फलक लावून शहर विद्रूप करणाºयाविरोधात कारवाई करताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणात फलक लावलेले असल्याने शहराचे विद्रूपीकरण होते.पालिकेच्या वतीने गेल्या २७ महिन्यात केवळ डीम्पी अ‍ॅडर्व्हटाझिंग या एकावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे बेकायदेशीररीत्या फलक लावणाºया विरोधात गुन्हे दाखल करण्यास पालिकेचे अधिकारी धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे.पनवेल महापालिकेला आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१८ या २७ महिन्यात १ कोटी १४ लाख ९३ हजार २२८ रुपयांचा जाहिरात कर मिळालेला आहे. तर बेकायदेशीर फलक लावून शहराचे विद्रूपीकरण करणाºयाकडून २ लाख ४५ हजार ५५० रु पयांचा दंड वसूल करण्यात आला. या दरम्यान पालिकेतर्फे एकूण १ हजार ८४५ बेकायदेशीर फलक काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.अधिकृत फलक लावण्यासाठी परवानगी घेऊन पालिकेने ५७ मोठमोठे होर्र्डिंग्स उभारलेले आहेत. पालिकेने पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर असे चार पदनिर्देशित अधिकारी नियुक्ती केलेली आहे. अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रूपीकरण करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी चार पदनिर्देशित अधिकाºयांवर आहे. असे असले तरी पालिका हद्दीत बेकायदेशीर फलक विद्रूपीकरण करणाºयाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना अधिकारी गुन्हे दाखल करत नसल्याने नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे पालिकेचे अधिकारी अनधिकृत फलक लावणाºयांवर गुन्हे दाखल करण्यात उदासीन असल्याचे दिसत आहे.>मानधनातून वसुली करण्याच्या नोटिसापनवेल नगरपालिका असताना जाहिरात धोरण निश्चित नव्हते. महापालिकेचे जाहिरात धोरण निश्चित झाले आहे. व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. नगरसेवकांकडून बेकायदा फलक लावल्याबद्दल मानधनातून वसुली करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत. महापालिका स्थापनेपासून पालिकेच्या अधिकाºयांनी केवळ एकावर शहर विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. यावरून पालिकेचे अधिकारी यांना बेकायदेशीर लावलेले फलक दिसत नाहीत. अधिकारी यावर कारवाई करत नसतील तर आयुक्तांनी अशा अधिकाºयांवर कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.>परिसरात विनापरवाना बॅनर लावले असतील तर पदनिर्देशित अधिकाºयांनी मालमत्ता विरु पण कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. यात हयगय केल्यास पदनिर्देशित अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगरपालिका