शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:50 IST

योग्य किंमत मिळत नसल्याची खंत

नवी मुंबई : शेतातील माल थेट बाजारात विकता यावा, याकरिता संत सावता माळी आठवडी बाजाराच्या माध्यमातून नवी मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने आठवडी बाजार सुरू करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत शहरात बहुतांश ठिकाणी आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. आठवडी बाजारातही स्थानिक फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी जागा अडविल्याने शेतकºयांना या ठिकाणी माल विक्री करणे अशक्य झाले आहे. स्थानिक विक्रेत्यांची अरेरावी, जागेवर केलेली अडवणूक, मालाला योग्य भाव न मिळाल्याने हे आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहेत.सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाशेजारी असलेल्या जागेवर दर शनिवारी आठवडी बाजार भरत असून, या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात जागा अडविल्याचे दिसून येते. शेतकºयांना या ठिकाणी शेतमाल विकता यावा, याकरिता माल घेऊन येतात. मात्र, स्थानिक विक्रेत्यांच्या अरेरावीपणामुळे या ठिकाणी शेतमाल विक्रीला पुरेसा वाव मिळत नसल्याची व्यथा शेतकºयांनी व्यक्त केली. सुरुवातीला काही महिने या ठिकाणी आठवडी बाजार या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र, हळूहळू ग्राहकांची संख्या रोडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजाराच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणीच स्थानिक विक्रेते मालविक्रीसाठी जागा अडवून बसत असल्याने शेतकºयांना मात्र या ठिकाणी मालाच्या विक्रीसाठी पुरेशी संधी मिळत नसल्याचेही येथील शेतकºयांनी स्पष्ट केले. या ठिकाणी मालाच्या विक्रीकरिता येणाºया शेतकºयांची संख्या कमी होत असून, पुढील काही आठवड्यांत हे प्रमाण आणखी कमी होईल, असेही शेतकºयांनी स्पष्ट केले. नेरुळ, वाशी, सानपाडा परिसरातही अशीच परिस्थिती असून, काही आठवड्यांनी हे बाजार बंद होतील, असे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरीही या आठवडी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी