शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे ४०० टन भाजीपाला वाया, ग्राहकांनी मार्केटकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:17 IST

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.

नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील शेतकºयांना बसला आहे. बुधवारी मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ५१५ ट्रक व टेम्पोमधून शेतमाल विक्रीसाठी आला होता. परंतु मुंबई जलमय झाल्याने किरकोळ विक्रेते मालखरेदीसाठी कमी प्रमाणात आले. परिणामी, एक हजार टनांपेक्षा जास्त कृषी मालाची विक्रीच झाली नाही. पावसामुळे भिजून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला फेकून द्यावा लागला. सडलेल्या मालाचे ढीग मार्केटमध्ये सर्वत्र पाहावयास मिळत होते. शिल्लक राहिलेला माल उद्या कमी किमतीमध्ये विकला जाईल.कांदा-बटाटा मार्केटमध्येही १२५ वाहनांची आवक झाली होती; परंतु त्यामधील फक्त २७ वाहनांमधील मालाचीच विक्री झाली आहे. फळ मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली त्यात ८३ वाहनांमधील फळांचीच विक्री झाली आहे. गुरुवारी व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.मुंबईमध्ये अतिवृष्टी झाल्याने ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरविली होती. जवळपास २० ते २५ टक्के माल शिल्लक राहिला असून, गुरुवारी सर्व व्यवहार सुरळीत होतील.- शंकर पिंगळे, व्यापारी एपीएमसीमार्केटचे नाव आवककांदा-बटाटा मार्केट १२५ गाड्याफळ मार्केट २०८ गाड्याभाजीपाला मार्केट ५१५ गाड्यामसाला मार्केट ०८४ गाड्याधान्य बाजार १८० गाड्या