शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेर-दिघाटी- केळवणे परिसरात पुन्हा एकदा फुटली बिबट्याची डरकाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 13:29 IST

मोबाईलवरूनच बिबट्याचे चित्रिकरण करून चित्रफीत वनविभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रवासी अनंत नारंगीकर यांनी दिली.

मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर परिसरातील इंद्रायणी डोंगराजवळील रस्त्यावर शनिवारी (१४) रात्री  ७-४५ च्या सुमारास प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. मोबाईलवरूनच बिबट्याचे चित्रिकरण करून चित्रफीत वनविभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रवासी अनंत नारंगीकर यांनी दिली.

मागील महिन्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यातून   चिरनेर-दिघाटी-केळवणे परिसरातील रस्ते , गावाजवळ बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले होते.त्यानंतर परिसरातील अनेक डोंगर, टेकड्या ,जंगल गावपरिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले जात होते.त्यानंतर शनिवारी ( १४) रात्री  ७-४५ च्या सुमारास चिरनेर परिसरातील दिघाटी - चिरनेर -इंद्रायणी डोंगराच्या जवळील रस्त्यावरुन जाताना एक बिबट्या प्रवाशांच्या निदर्शनास आले आहे.गाडीतुन प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या बिबट्याचे फोटो,

चित्रिकरणही प्रवाशांनी केले आहे.मोबाईलवरून बिबट्याचे चित्रिकरण केलेली चित्रफीत वनविभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रवासी अनंत नारंगीकर यांनी दिली.  भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या नागरी परिसरात येत असल्याने वन विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून याआधीच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत ठिक ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी परिसरातील नागरिकांची दोन दिवसांत बैठक बोलावली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान चिरनेर परिसरातील दिघाटी - चिरनेर -इंद्रायणी डोंगर परिसरात पुन्हा एकदा फुटलेल्या बिबट्यांच्या डरकाळीने मात्र रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.