शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:26 IST

खटल्याच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी अज्ञाताने थेट न्यायालयातच हा लिंबू-मिरचीचा उतारा केला होता. यानंतर एक न्यायाधीश चार दिवस सुटीवर गेले होते, अशीही चर्चा आहे.

नवी मुंबई : बेलापूर कोर्टात न्यायाधीशांवर दडपण आणण्यासाठी थेट काळ्या जादूचा प्रयोग होऊ लागल्याचे समोर आले आहे. खटल्याच्या निकालावर प्रभाव पाडण्यासाठी अज्ञाताने थेट न्यायालयातच हा लिंबू-मिरचीचा उतारा केला होता. यानंतर एक न्यायाधीश चार दिवस सुटीवर गेले होते, अशीही चर्चा आहे.

नागरिकांमध्ये अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच एका वकिलाने पैसे दुप्पट करण्यासाठी मांत्रिकाच्या नादाला लागून पूजेचा घाट मांडला होता. शहरात अशी अनेक उदाहरणे असतानाच थेट न्यायालयातदेखील लिंबू-मिरचीचा वापर होऊ लागल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात बेलापूर कोर्टाच्या पाचव्या मजल्यावर अज्ञाताने मंतरलेली लिंबू -मिरची ठेवली होती. न्यायालयात येणाऱ्या व्यक्तींसाठी बैठक व्यवस्था असलेल्या ठिकाणी ते ठेवले होते. एक व्यक्तीने त्याचा काढलेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार समोर आला. त्यानंतर हे लिंबू-मिरची  हटवली गेली. मात्र, या घटनेनंतर एक न्यायाधीश चार दिवसांच्या सुटीवर गेले होते अशीही न्यायालयात चर्चा आहे. 

न्यायालयात सीसीटीव्ही नाहीबेलापूर न्यायालयात यापूर्वी सरकारी वकिलांवर हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच लिंबू-फिरवण्याचेही प्रकार घडू लागले आहेत. इमारतीत सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नसल्याने न्यायालयाचीच सुरक्षा उघड्यावर पडल्याची खंत व्यक्त होत आहे. भविष्यात न्यायालयात कोणती गंभीर घटना घडल्यास सीसीटीव्हीअभावी पोलिसांची तपासात दमछाक होऊ शकते.

पोलिसात तक्रार नाहीन्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून अशा घटनांबाबत कोणत्याही पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. परंतु, आजवर रस्त्यांवर, चौकात चोरी छुपे घडणारे मंत्र तंत्राचे प्रकार चक्क न्यायालयातचदेखील घडू लागल्याने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचे घोंगडे न्यायालयात भिजत पडल्याचे दिसून येत आहे.

अज्ञात व्यक्तीने त्याच्या खटल्याच्या निकालासाठी हा लिंबू-मिरचीप्रयोग केल्याची शक्यता आहे. मात्र, बेलापूर न्यायालयात ही घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी एका न्यायाधीशाच्या खुर्चीखालीच हळदकुंकू टाकले होते. यावरून न्यायालयात खटल्यांचा निकाल पदरात पाडून घेण्यासाठी न्यायाधीशांवर दडपण आणण्याकरिता थेट लिंबू-मिरचीचाच आसरा घेतला जात असल्याची बाब समोर येत आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयNavi Mumbaiनवी मुंबई