शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:04 IST

पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते

पनवेल : पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे अशी अपेक्षा होती, त्यानुसार हे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात आवश्यक असलेल्या बाबींची मी यादी तयार के ली आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी के ले.

पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. १२० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रॉमा सेंटर, १०० खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये शव ठेवण्यासाठी कोणतीच सुविधा अवलंबून नसल्याने पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागत आहेत. विशेष म्हणजे, पनवेल शहरातील पालिका मुख्यालयाजवळील शवविच्छेदनगृहही अपुऱ्या जागेत एका दुरवस्था झालेल्या खोलीत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करावे लागत आहे.

पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते, असे हे उपचार खर्चिक असले तरी पर्यायाच्या अभावी तालुक्यातील नागरिकांना महागडी अशी आरोग्यसेवा स्वीकारावी लागते. मात्र, उपजिल्हा रुग्णालयामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सक आदी असणार आहेत.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, गौरी राठोड, दिलीप हळदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर आदीसह नागरिक उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांची अनुपस्थितीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. मात्र, ऐन वेळेला मुख्यमंत्री कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार या उद्देशाने संपूर्ण पनवेल शहर चकाचक करण्यात आले होते.