शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत १७०० वाहनांची चोरी, गतवर्षात ३५६ वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:16 IST

गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.

नवी मुंबई : गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील तीन वर्षात १७०० हून अधिक वाहने चोरीला गेली आहेत. २०१५ मध्ये ५९४ तर २०१६ मध्ये ६७६ वाहन चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी सुमारे पाचशे गुन्हे तीन वर्षात उघड झाले आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. अनेकदा चोरीची वाहने राज्याबाहेर नेली जात असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपेक्षित यश येत नाही. मागील दोन वर्षात पोलिसांनी दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यामुळे गतवर्षात वाहनचोरीच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे. त्यानुसार वर्षभरात परिमंडळ एकमध्ये ३५६ गुन्हे घडले असून २०१६ साली ४८० गुन्हे घडले होते. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ट्रक, टेंपो, कार यासह दुचाकींचा समावेश आहे. इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकीची चोरी सहज शक्य असते. यामुळे परिमंडळ एकमध्ये गतवर्षी झालेल्या गुन्ह्यांमध्ये २१७ गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत.शहरात नियोजनबध्द वाहन पार्किंग नसल्याने रस्त्यालगत, मोकळ्या जागेवर वाहने उभी केली जातात. त्यात दुचाकी म्हणजे वाटेल तिथे उभे करण्याचे वाहन असा काहींचा समज आहे. यामुळे नो पार्किंगमधून अथवा रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक आहे. वाहन चालकांकडून योग्यती खबरदारी घेतली जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसांना देखील डोकेदुखी होत आहे. गतवर्षात उघड झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचाही समावेश असल्याचे समोर आलेले आहे. मौज म्हणून चोरलेली दुचाकी वापरून आडोशाच्या ठिकाणी टाकली जाते, अथवा विकली जाते. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन परत मिळेल याची शाश्वती कमी झालेली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई