शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

विमानतळबाधितांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:20 IST

१५ जानेवारी अंतिम मुदत : सिडकोच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. स्थलांतरासाठी सिडकोने दिलेली मुदत १५ जानेवारी रोजी संपत आहे. शेवटच्या दिवसात स्थलांतराची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणारी दहा गावे स्थलांतरित केली जात आहेत. या गावांचे वडघर, वाहळ आणि कुंडे वाहळ या ठिकाणी पुनर्वसन व पुन:स्थापना करण्यात येत आहे. दहा गावातून स्थलांतरित होणाºया कुटुंबांची संख्या ३000 इतकी आहे. स्थलांतरित होणाºया ग्रामस्थांना यापूर्वी तीन वेळा मुदत देण्यात आली होती. पुनर्वसन पॅकेजसह प्रोत्साहन भत्ता सुध्दा जाहीर करण्यात आला होता. परंतु लहान मोठ्या मागण्यांचा रेटा पुढे करीत ग्रामस्थांनी स्थलांतराला विरोध दर्शविला. अखेर दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार उर्वरित ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपत असून रविवारपर्यंत जवळपास ८0 टक्के ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी अर्ज सादर केले आहे. तर दहापैकी वरचे ओवळा, वाघिवलीवाडी ही दोन गावे शंभर टक्के रिकामे झालीआहेत.

कोपर , कोल्ही व चिंचपाडा या तीन गावांचे ९५ टक्के स्थलांतर झाले आहे. तरघर ८५ टक्के तर गणेशपुरी गावातील ७0 टक्के स्थलांतर पूर्ण झाले आहे. तसेच उलवेतील ५00 ग्रामस्थांपैकी ३00 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोंबडभुजेमधील ३२५ पैकी १७0 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. उद्याच्या शेवटच्या दिवसात १00 टक्के स्थलांतर होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.स्थलांतरासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहनआर्थिक नुकसान टाळण्यासाठी अंतिम मुदतीत ग्रामस्थांनी स्थलांतर करावे, यासाठी सिडकोच्या वतीने विविध स्तरावर प्रयास करण्यात आले. सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी याप्रकरणात विशेष लक्ष घातले होते.गाव स्तरावर बैठका घेवून ग्रामस्थांना स्थलांतरासाठी प्रोत्साहित केले. तसेच ग्रामस्थांनी वैयक्तिक पत्रे देवून अंतिम मुदतीचे स्मरण करून देण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही संबंधित कार्यालय सुरू ठेवण्यात आले. याचा परिणाम म्हणून मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थलांतराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.

स्थलांतर १५ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नाही. उद्या अखेरचा दिवस असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी रात्री ८ वाजेपर्यंत संबंधित कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे.च्या कालावधीत सादर होणाºया अर्जाची पुढील दोन दिवसात तपासणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल. दिलेल्या मुदतीत ज्यांनी स्थलांतर केले नाही, अशा प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणाबाबत यानंतर राज्य शासन निर्णय घेईल, असे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.वाघिवलीच्या स्थलांतराची घाई नाहीच्तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा आणि वाघिवली अशी स्थलांतरित होणाºया गावांची नावे आहेत. यापैकी वाघिवली हे गाव गाभा क्षेत्राच्या बाहेर असल्याने सध्या सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. त्यामुळे या गावाचे स्थलांतर अद्याप शिल्लक आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ