शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 00:16 IST

तीन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी घेतला लाभ; समागमातील लंगर व्यवस्थापनाची सर्वत्र चर्चा

पनवेल : खारघरमधील सिडको मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता सोमवारी झाली. देशभरातील लाखो भक्तगण यावेळी सहभागी झाले होते. उत्तम नियोजन व व्यवस्थापन असलेल्या समागमातील लंगर (जेवण व्यवस्थापन) यावेळी चर्चेचा विषय ठरला.संत समागमाचे आयोजन मागील अनेक वर्षांपासून खारघर याठिकाणी केले जाते. समागमात देशभरातील अनुयायी सहभागी होतात. तीन दिवस विविध कार्यक्र म याठिकाणी पार पडत असतात. यामध्ये भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्र म, रक्तदान शिबिर आदींसह सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात येते.लाखोंच्या संख्येने भक्तगणांच्या जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी लंगरमध्ये केली जाते. सुमारे दहा एकर परिसरात हे लंगर असून मोफत जेवण दिले जाते. चपाती (फुलका), सब्जी (भाजी), भात, डाळ , लोणचे या पदार्थांचा जेवणात समावेश असतो. २४ तास हे लंगर सुरू असते. २४ मोठ्या कढईच्या साहाय्याने जेवण तयार केले जाते. दरवर्षी भक्तगणांमध्ये वाढ होत असून देशभरातील सर्वात मोठा लंगर याठिकाणी समागमाच्या काळात सुरू असतो.लंगरचे व्यवस्थापनदहा एकरमध्ये पसरलेल्या लंगरमध्ये एका वेळेला १८ हजार व्यक्ती एका पंगतीत बसतात. सुमारे २४ कढयांमध्ये भाज्या, भात तयार केले जातात. प्रत्येक कढईची क्षमता ६०० किलोग्रॅम इतकी असते.याशिवाय १६ तव्यांवर एकाचवेळी २० महिलांच्या मार्फत चपात्या केल्या जातात. लंगर नियोजनासाठी दीड हजार स्वयंसेवक याठिकाणी कार्यरत होते, अशी माहिती लंगर व्यवस्थापक अशोक केरेकर यांनी दिली.

टॅग्स :sikhशीख