शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लेडीज बार, पबवर पहाटे तीनपर्यंत धडक कारवाई; पुण्यानंतर नवी मुंबई महापालिकेचा दणका 

By नामदेव मोरे | Updated: May 29, 2024 19:31 IST

सहा बारसह पबचे अतिक्रमण हटविले.

नवी मुंबई : 'बाळा'ने केलेल्या अपघातानंतर जाग आलेल्या पुणे महापालिकेने आपल्या हद्दीतील अनधिकृत पब, बारविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. यातून शहाणे होऊन नवी मुंबई महापालिकेनेही आपल्या शहरातील लेडीज बार, पब, ढाबे, चायनीज सेंटरविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यानुसार बुधवारी मंगळवारी रात्री दहा ते बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत ६ पब व बार, एका ढाब्यासयह तीन चायनीज सेंटरची अतिक्रमणे हटविली. महानगरपालिकेच्या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.

शहरात अनेक ठिकाणी लेडीज बार, पब व इतर हॉटेलचालकांनी सार्वजनिक वापरासाठी असलेल्या जागेत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. पावसाळी शेडच्या नावाखाली हॉटेलसमोर व बाजूला शेड तयार करून तेथेही व्यवसाय केला जात आहे. ढाबे, चायनीज सेंटर चालकांनी मूळ दुकानांपेक्षा दुप्पट जागेत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही स्वत:हून अतिक्रमण न हटविणारांविरोधात मंगळवारी रात्री दहा वाजतापासून बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत बेलापूर व तुर्भे विभागात मोहीम राबविली.बेलापूरमधील हॉटेल स्टार नाईट, हॉटेल स्वीकेन्स, मेघराज व साई ढाबा तर तुर्भे विभागातील टी व्हीला कॅफे, टेस्ट ऑफ पंजाब, येलो बनाना फूड यांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख रुपये दंड वसूल केला.

शहरातील सर्व हॉटेल व पबचालकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली असून, यामध्ये तुर्भेचे विभाग अधिकारी भरत धांडे, बेलापूरचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय गडदे, डॉ. अमोल पालवे, सागर मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. बेलापूर व तुर्भे विभागात अतिक्रमण करणाऱ्या हॉटेल व बार चालकांवर कारवाई केली आहे. शहरातील अतिक्रमण करणाऱ्या इतर हॉटेलचालकांनाही नोटिसा दिल्या असून, नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. - डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग अतिक्रमण विभागाने कारवाई केलेल्या हॉटेलचा तपशीलबेलापूरहॉटेल स्टार नाईटहॉटेल स्वीकेन्सहॉटेल मेघराजसाई ढाबातुर्भे विभागटी व्हीला कॅफेटेस्ट ऑफ पंजाबयेलो बनाना फूड प्रा. लि. अंतर्गत अतिक्रमणांवरही होणार कारवाईमहानगरपालिका प्रशासनाने हॉटेलचालकांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. अनेक हाॅटेलचालकांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता हाॅटेल व बारमधील अंतर्गत बांधकामामध्ये बदल केले आहेत. काही ठिकाणी पोटमाळेही तयार केले आहेत. अशा सर्व अतिक्रमणांवरही कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई