शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुविधांची वानवा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 00:40 IST

महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहकांची ये-जा असते. मात्र, येथे अस्वच्छता व सुविधा नसल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो.

- मयुर तांबडेनवीन पनवेल : करोडो रुपये खर्च करून बांधलेले पनवेल येथील व्यापारी संकुल अनेक समस्यांनी ग्रासले आहे. कित्येक वेळा पालिकेत लेखी तक्रारी करूनही पालिका लक्ष देत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहकांची ये-जा असते. मात्र, येथे अस्वच्छता व सुविधा नसल्यामुळे त्यांच्याही जीवाला धोका उद्भवू शकतो. अनेकांचे गाळे लिकेज झाले आहेत, त्यामुळे स्लॅबवरून पाणी गाळ्याच्या आतमध्ये पडत आहे. फर्निचर, टेबल यांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारींत वाढ होत आहे. काही गाळेधारकांनी स्लॅबवर प्लॅस्टीकचे आवरण टाकले आहे. त्यामुळे तात्पुरता गळतीपासून त्यांना आराम मिळाला आहे.व्यापारी संकुलातील अनेक बाथरूमचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही बाथरूममध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. टेरेसवरील डेब्रिजही संकुलात टाकून देण्यात आलेले आहे. गटारावरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत. व्यापारी संकुलात येणारी दोन्ही रस्ते मच्छीविक्रेते आणि हार बनविणाऱ्यांनी अडवले आहेत. संकुलातील काही ठिकाणचे स्लॅब खाली कोसळले आहे. टेरेसजवळील खोलीला टाकण्यात आलेले पत्रे फुटल्याने त्यातून संपूर्ण पायºयांवर पावसाळ्यात खाली पाणी येत आहे. पावसाचे पाणी जिन्याच्या पायºयांवरून थेट खाली येत आहे. त्यामुळे या पायºयांवरून चालताना नागरिकांचे पाय घसरून ते खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुरुष आणि महिलांच्या बाथरूमची अवस्था दयनीय झालेली आहे. दरवाजे तुटलेले असून, खिडक्याही नाहीत. बाथरूममधील फ्लश टँकही तुटलेले आहे. मीटर रूमही उघडे ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या कॉलमला तडे गेलेले आहेत. बहुतांशी ठिकाणच्या ट्यूब लाइट बंद अवस्थेत असल्याने, रात्रीच्या वेळेस अंधार पसरत असल्याचे येथील गाळेधारकांचे म्हणणे आहे.संकुलातील विजेच्या केबल उघड्या स्थितीत आहेत. त्यामुळे येथे येणाºया-जाणाºया नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. लिफ्टसाठी ठेवण्यात आलेल्या जागेत प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा ढीग साचलेला आहे. लिफ्टची वरील भिंतही फुटलेल्या अवस्थेत आहे. सुरक्षारक्षक नसल्याने व्यापारी संकुलात भिकारी, हार विक्री करणारे यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. टेरेसवरील पाण्याच्या टाक्या तुटलेल्या आहेत. त्यावर झाकणेही नसल्याने त्यात पक्षीही मरून पडत असल्याचे येथील गाळेधारकांनी सांगितले. कॉम्प्लेक्सला वर पत्रे टाकले नसल्याने पूर्ण कॉम्प्लेक्सला गळती लगलेली आहे. टेरेसवर कॉलमसाठी काढण्यात आलेले लोखंडी स्टील उघड्या स्थितीत असल्याने त्यातून पाणी खाली लिकेज होत आहे. 

टॅग्स :panvelपनवेल