शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम पाडताना पडून मजुराचा मृत्यू, एक जखमी, तुर्भे येथील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 3, 2023 19:25 IST

जुन्या कंपनीची इमारत पाडताना घडली दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कंपनीचे बांधकाम पाडताना दोन मजूर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदार व जबाबदार व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. 

तुर्भे नाका येथील बागडे कंपनी परिसरातील कांचन (डी ३५०) कंपनीच्या ठिकाणी हि दुर्घटना घडली. सदर कंपनीचे जुने बांधकाम पाडण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी त्याठिकाणी बांधकाम पाडण्याचे काम सुरु होते. यावेळी दुसऱ्या मजल्यावर काम करणारे दोन मजूर बांधकाम ढासळून खाली पडले. यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अमिनुल रियाजुद्दीन हक (२३) याचा मृत्यू झाला, तर अश्रफउल जैनुल हक (२३) हा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी कामगारांच्या सुरक्षेत हलगर्जी झाल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदार व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. 

टॅग्स :Accidentअपघात