शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:52 IST

महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाºया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

नवी मुंबई : महाराष्ट्राची शान म्हणूून ओळखल्या जाणाºया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८व्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवरायांना मानाचा मुजरा देत शहरात अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली होती.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास ब्रान्टो स्कायलिफ्ट या अत्याधुनिक वाहनाच्या साहाय्याने पुष्पमालिका अर्पण करण्यात आली. महापौर जयवंत सुतार यांच्या शुभहस्ते, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची उपस्थिती होती. महापालिका मुख्यालयातही अ‍ॅम्पीथिएटर येथे छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन करण्यात आले. नेरुळमधील गणपतशेठ तांडेल मैदानासमोरील परिसरात शिवजन्मोत्सव सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बेलापूरमध्ये नगरसेविका सरोज पाटील, रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयकर कॉलनी परिसरात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडदुर्गांच्या छायाचित्रांचे, शस्त्र व शिवकालीन नाणी यांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवत आणि या गडकोटांची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी आपला कट्टा संस्था, श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड व नवी मुंबई महानगरपालिका, शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी न.मुं.म.पा. शाळा क्र . ४८, से-८, ऐरोली येथे शिवस्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि काही दुर्मीळ अशा गडदुर्गांची छायाचित्रे तसेच शस्त्र संग्राहक सुनील कदम यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्र व प्रवीण मोहिते यांच्या संग्रहातील शिवराई व ब्रिटिश नाणी इथे पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली असून शहरातील शाळांनी भरघोस प्रतिसाद दिला. भारतीय टपाल विभागाने छत्रपती शिवरायांवर प्रकाशित केलेली काही टपाल तिकिटे व विशेष लिफाफे या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे प्रतिवर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी होणाºया शिवराज्याभिषेक सोहळ्याची चित्रफीत दाखवण्यात आली. नव्या पिढीला इतिहासातील घटनांचा मागोवा घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जागवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज