भाग्यश्री प्रधान, ठाणेजन्माष्टमीनिमित्ताने बालकृष्णाच्या मूर्ती व त्याच्या विविध आभूषणांनी बाजार सजला आहे. डिझेलचे भाव वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढल्यामुळे मूर्ती व या आभूषणांच्या, अंगरख्यांच्या किमतीमध्ये यंदा ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. शाडूमाती, प्लॅस्टर आॅफ पॅरीस तसेच चांदी, सोने तसेच कांस्य या धातूंमध्ये श्रीकृष्णाच्या विविध मूर्ती उपलब्ध असून त्याला प्रिय असणाऱ्या अनेक वस्तूंचीही सध्या बाजारात चलती आहे. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला नवीन वस्त्रे घालण्याची प्रथा आहे. गोलाकाराची ही वस्त्रे वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध असून बालकृष्णाचे रूप अधिक लोभस करण्यासाठी फेटा तसेच बासरीही विक्रीसाठी ठेवली आहे. ही वस्त्रे २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत बालकृष्ण मूर्तीच्या आकारमानाप्रमाणे कमीजास्त साइजमध्ये उपलब्ध आहेत.
कृष्णाची आभूषणे महागली
By admin | Updated: September 3, 2015 02:48 IST