शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:24 IST

आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची वानवा, तडे गेलेल्या भिंती, छताची पडझड, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूमची दुरवस्था, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी उरण-कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला वेढले आहे.

- मधुकर ठाकूर उरण : आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची वानवा, तडे गेलेल्या भिंती, छताची पडझड, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूमची दुरवस्था, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी उरण-कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला वेढले आहे. रुग्णालयाच्या दुरवस्थेमुळे गरोदर मातांचे आणि इतर रुग्णांचे हाल होत असताना लोकप्रतिनिधी आणि रायगड जिल्हा परिषद याकडे डोळेझाक करत आहे.उरण तालुक्यातील गोरगरीब लोकांना माफक दरात उपचार मिळावेत, यासाठी शासनाने कोप्रोली प्राथमिक आरोग्यकेंद्राची उभारणी उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत केली. हे रुग्णालय रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचा कारभार पाहिला जातो; परंतु या रुग्णालयात वारंवार डॉक्टरांची, परिचारिकेची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांवर, कर्मचाºयांवर कामांचा अतिरिक्त ताण पडत आहे.उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असले, तरी येथील लोक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात, डोंगरकपारीत (आदिवासी बांधव) राहत आहेत. त्यामुळे वाढत्या अपघातातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच पावसाळ्यातील साथीजन्य आजारांवर, सर्पदंश, कुत्रा चावणे यावर उपचार करून घेण्यासाठी जाणाºया रु ग्णांना त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात गरोदर मातांसाठी असणारे आॅपरेशन थिएटर गेली अनेक महिने बंद असल्याने आॅपरेशनसाठी गरोदर मातांची (रुग्णांची ) वणवण सुरू आहे.तरी उरण तालुक्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्यकेंद्रातील अवकळा दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी, रायगड जिल्हा परिषद यांनी एक दिवशी पाहणीदौरा करून सदर रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिक, आदिवासी बांधव करीत आहेत. यासंदर्भात उरण तालुका वैद्यकीय अधिकारी इटकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती देताना सांगितले की हे रु ग्णालय अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे रु ग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे. तसेच पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तरी सध्या रुग्णालयात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, या परिसरात सर्पदंश, कुत्रा चावणे, इतर साथीजन्य आजार उद्भवणाºया रु ग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे सदर रु ग्ण कोप्रोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असतात; परंतु सुविधांअभावी रुग्णांना नाइलाजाने इतर ठिकाणी उपचारार्थ जावे लागते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, संबंधित विभाग यांच्याकडे मागणी केली आहे; परंतु या रु ग्णालयासाठी डॉक्टर इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासन चालढकलपणा करीत आहे.>अपघातातील रुग्णांवर तसेच पावसाळ्यातील साथीजन्य आजारांवर, सर्पदंश, कुत्रा चावणे यावर उपचारासाठी जाणाºया रु ग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.