शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

मुंबई-दिल्ली फ्रेट काॅरिडाॅरला कोकण आयुक्त समितीचा उतारा 

By नारायण जाधव | Updated: February 19, 2023 12:02 IST

काम कूर्म गतीने : भूसंपादनासह आरओबीच्या कामांना वेग मिळणार

नवी मुंबई : देशात रेल्वेद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीत मैलाचा दगड ठरणारा जेएनपीटी ते दादरीमार्गे दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामाला गती देण्यासाठी गृह विभागाने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली टास्क समितीचा उतारा शोधला आहे. ही समिती मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे जलद गतीने भूसंपादन करून रेल्वे वाहतूूक अधिक वेगवान होण्यासाठी आरओबी बाधंणे, जलवाहिन्या आणि वीजवाहिन्यांचे स्थलांतर इत्यादींसाठी प्रयत्न करणार आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने या महामार्गाला मंजुरी दिली. त्यानंतर नरेंद्र माेदी सरकारच्या काळात या मार्गाला गती देण्यात  आली आहे. हा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मुंबई ते दिल्ली दरम्यानच्या रेल्वे वाहतुकीत मैलाचा दगड ठरणार असल्याने त्यावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विविध देशांतून समुद्रमार्गे जेएनपीटीत येणाऱ्या मालाची उत्तर भारतात वेगाने वाहतूक हाेण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे.  

 ही कामे वेळेत करण्याचे निर्देश ही समिती मुंबई-दिल्ली फ्रेट काॅरिडाॅरला लागणाऱ्या खासगी, शासकीय जमिनीसह वन जमिनीचे भूसंपादन  जलद गतीने करणे, बाधितांना मोबदला देऊन संबंधित जमीन वेळेत हस्तांतरित करणे, वीजवाहिन्या, जलवाहिन्यांच्या स्थलांतराला गती देणे, आरओबी बांधण्यासाठी जमीन हस्तांतरित करणे अशी कामे जलद गतीने कशी होतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. 

 ३०४३ खारफुटी तोडण्यास मंजुरी सीआरझेडच्या ना-हरकत प्रमाणपत्राची मुदत नोव्हेंबर २०२१मध्येच संपली. यामुळे ती पुन्हा नव्याने वाढवून मिळण्यासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरने अर्ज केला आहे. या दरम्यान बाधित होणाऱ्या खारफुटींची संख्या ३,०४३ झाली असून, ती ताेडण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२२ मध्ये परवानगी दिली आहे.

१७६ किमी राज्यात लांबीया कॉरिडाॅरचे जेएनपीटी ते दादरीपर्यंतचे अंतर १५०४ किलोमीटर आहे. राज्यातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून हा मार्ग जात आहे. राज्यातील  त्याची लांबी १७६ किलाेमीटर इतकी आहे. मात्र, राज्यात त्याचे काम कासवगतीने सुरू असल्याचे मुख्य सचिवांनी १५ फेब्रुवारी २०२३ रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत निदर्शनास आले. त्यानुसार या कामाला गती देण्यासाठी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 

१६ अधिकाऱ्यांचा समितीत समावेशया समितीत कोकण आयुक्तांसह रायगड, ठाणे आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, कल्याण-डोंबिवली महापालिका, कोकण विभागाचे पुनर्वसन विभागाचे उपायुक्त, वेस्टर्न आणि दक्षिण डेडिकेटेड कॉरिडाॅर कार्पोरेशनचे महाव्यवस्थापक, कार्यकारी संचालक, रस्ते विकास महामंडळासह मध्य रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणे, रायगड, पालघर या तिन्ही जिल्ह्यांचे कार्यकारी अभियंता आणि मुख्य वन संरक्षक ठाणे अशा १६ जणांचा समावेश आहे.