शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेडिंगमध्ये नुकसानाच्या भरपाईसाठी ब्रोकरचे अपहरण; ऐरोलीतली घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2024 16:26 IST

मारहाण करून खात्यातून काढून घेतले पैसे

नवी मुंबई : ट्रेडिंग मध्ये लावलेल्या पैशाचा अपेक्षित असा मोबदला न मिळाल्याने ब्रोकरचे अपहरण करून मारहाण करत त्याच्या खात्यातून पैसे काढल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सात जणांवर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ऐरोली येथे राहणाऱ्या प्रतीक जाधव (२८) याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तो ऑनलाईन ट्रेडिंग करत असून इतरांनाही गुंतवणुकीच्या माध्यमातून नफा मिळवून देण्याचे काम करतो. मागील काही महिन्यांपूर्वी त्याने ऐरोली परिसरात राहणाऱ्या काहींना गुंतवणुकीच्या अधिक पटीने नफा मिळवून दिला होता. त्यानुसार श्रद्धा कदम, सागर कड यांनी व त्याच्या काही मित्रांनी देखील त्याच्यामार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. मात्र त्यामधून अपेक्षित असा नफा झाला नव्हता. यामुळे त्यांच्याकडून प्रतीक याच्याकडे अधिक पैशाची मागणी केली जात होती.

परंतु मार्केट मध्ये आपलेही नुकसान झाले असल्याचे तो सतत सांगत होता. यानंतरही त्यांनी ६ मार्चला सर्वांनी त्याला भेटीसाठी बोलावून कारमध्ये कोंबून अपहरण केले. त्याला ऐरोलीत एका ठिकाणी नेवून तिथे मारहाण करून पुन्हा तळोजा येथे एकाच्या घरामध्ये नेले होते. त्याठिकाणी देखील त्याला मारहाण करत त्याच्या मोबाईल मधील बँकेच्या ऍप्लिकेशन मधून पैसे काढून घेतले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याला इमारतीखाली आणून सोडले होते. या घटनेनंतर भयभीत झालेला प्रतीक गावाकडे गेला होता. मात्र नुकताच तो परत आल्यानंतर पुन्हा त्याला पैशासाठी धमकावू लागल्याने त्याने रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सागर कड, ओंकार प्रभू, श्रद्धा कदम, अजय पासाळकर व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.