शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 22, 2024 18:51 IST

ज्ञातामार्फत आंब्याची ऑर्डर देऊन रचला कट

नवी मुंबई : आंब्याच्या खरेदीचे २९ हजार रुपये वसुलीसाठी व्यक्तीच्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बनावट ग्राहक तयार करून वडाळा येथून नेरूळमध्ये आंबे मागवण्यात आले होते. हे आंबे घेऊन व्यापाऱ्याचा अल्पवयीन मुलगा नेरूळमध्ये आला असता त्याचे अपहरण करून गाळ्यावर नेवून मारहाण करण्यात आली. 

वडाळा येथील किरकोळ आंबे विक्रेते प्रेमकुमार यादव (४२) यांच्यासोबत १० एप्रिलला हि घटना घडली आहे. मात्र या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अमर उकिर्डे, वसीकुल इस्लाम व इतर एकजण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव यांनी एपीएमसी मधील व्यापारी वसीकुल याच्याकडून गतवर्षी आंबे खरेदी केले होते. त्याचे २९ हजार रुपये त्यांनी दिले नव्हते. या पैशासाठी वसीकुल याच्याकडून तगादा सुरु होता. त्यानंतरही यादव आंब्याच्या बिलाचे थकीत पैसे देत नसल्याने त्याने अपहरणाचा कट रचला होता. यासाठी अमरच्या माध्यमातून यादव यांना फोन करून १० डझन आंब्याची ऑर्डर देण्यात आली होती. हे आंबे घेऊन यादव यांचा सहकारी व  मुलगा अलोक (१५) नेरूळमध्ये आला होता. स्थानकाच्या बाहेर दोघेही येताच त्याठिकाणी थांबलेल्या वसीकुल याने अलोकला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अलोकने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वसीकुलचा एक सहकारी दुचाकीवर मागे बसून दोघांनी त्याला एपीएमसी मध्ये आणले. त्याठिकाणी त्याला मारहाण करत वडील प्रेमकुमार यादव यांना फोन करून थकबाकीच्या २९ हजाराची मागणी करण्यात आली. त्यानंतर पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री त्याला सोडण्यात आले. या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री नेरुळ पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.