शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपीकडून अल्पवयीन मुलाचे अपहरण; रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये घटना चित्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 02:15 IST

आईवडिलांसोबत वडापाव खाण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना वाशी येथे घडली आहे. वाशी रेल्वेस्थानकालगत झोपडीमध्ये राहणाºया कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : आईवडिलांसोबत वडापाव खाण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाच्या अपहरणाची घटना वाशी येथे घडली आहे. वाशी रेल्वेस्थानकालगत झोपडीमध्ये राहणाºया कुटुंबासोबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता, एक मद्यपी त्या मुलाला घेऊन जाताना दिसत आहे. मात्र, त्याच्याविषयीची अधिक माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.रघू नाना शिंदे (०३), असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वाशी रेल्वेस्थानकालगतच्या मोकळ्या भूखंडावरील झोपडीत राहणारा असून आईवडील बिगारी कामगार आहेत. बुधवारी दुपारी आईवडिलांसोबत रेल्वे -स्थानकाबाहेरील वडापावच्या दुकानावर तो आला होता. या वेळी आईवडील वडापाव घेत असताना, त्याचा हात मोकळा सोडलेला होता; परंतु काही वेळातच तो त्या ठिकाणावरून दिसेनासा झाला. यामुळे आईवडिलांनी त्याचा परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. याप्रकरणी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली असता, रघूच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपीच्या शोधाकरिता पोलिसांनी रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता, एक मद्यपी व्यक्ती त्याला घेऊन जाताना दिसून आली. फलाट क्रमांक-तीन वरून ही व्यक्ती रघूला घेऊन पनवेलच्या दिशेने जाणाºया रेल्वेतून निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. मात्र, सानपाडा ते पनवेल दरम्यानच्या स्थानकातील सीसीटीव्ही तपासले असता, त्यात कोणीच पोलिसांना दिसून आलेले नाही. यामुळे मुलाचे अपहरण केलेली व्यक्ती नेमकी गेली कुठे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. दरम्यान, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.