शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण करून महिलेची हत्या करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 05:22 IST

तो सराईत गुन्हेगार असून, त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे.

नवी मुंबई : कारमध्ये बसलेल्या महिलेचे कारसह अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला बुधवारी रात्री अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून, त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. उलवे सेक्टर १९ येथे सोमवारी बाळकृष्ण भगत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पत्नी प्रभावती (५६) ह्या कारमध्ये बसल्या होत्या. त्या एकट्याच बसल्याची संधी साधून एक जण कारमध्ये घुसला. त्याने कारसह प्रभावती यांचे अपहरण करून त्यांना सेक्टर २३ परिसरात नेले. तेथे त्यांच्यावर गोळी झाडून त्याने पळ काढला होता. प्रभावती यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कसून तपास सुरू केला. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिमंडळ एक, परिमंडळ दोन तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार केली होती. त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवले होते. त्याद्वारे संशयित आरोपीची माहिती मिळाली होती.बुधवारी संध्याकाळी खारघर परिसरात सापळा रचून एकाला ताब्यात घेण्यात आले. झडती वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन मॅगझिन व नऊ काडतुसे आढळली. चौकशीत त्याचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो उलवे सेक्टर ९ मध्ये राहणारा असल्याचे कळले. त्याने प्रभावती यांची हत्या केल्याचीही कबुली दिली. सखोल चौकशीअंती बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याने लुटीच्या उद्देशानेच प्रभावती यांचे अपहरण करून पळ काढल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.>कारसह पकडलेगुन्ह्यानंतर तो ज्या कारने उलवे परिसरातून पळाला होता, त्याच कारसह तो खारघरमध्ये आढळून आला. ही कार त्याने वाशी परिसरातून चोरली होती. त्यानंतर कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.