शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खारघरमध्ये मतदारयाद्यांत घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:38 IST

नगरसेविकेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

पनवेल : लोकसभेच्या निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. विविध टप्प्यात देशभरात या निवडणुका होत आहेत. मात्र, मतदारयादींतील घोळामुळे नावे शोधताना नागरिकांची दमछाक होताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.खारघर शहरातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे, त्यामुळे निवडणुकीच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात स्थानिक नगरसेविका व महिला बाल कल्याण सभापती लीना गरड यांनी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांना निवेदन सादर करून मतदारयादींमधील निर्माण झालेला गोंधळ लवकरात लवकर दूर करण्याची मागणी केली आहे.खारघर नोडमध्ये एकूण एक लाख ३० हजारांच्या आसपास मतदार आहेत. शहरात एकूण आठ मतदार केंद्र आहेत, तसेच ८६ बूथचा समावेश आहे. यापूर्वीची मतदार केंद्रे रद्द झाल्याने शहरातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. एका कुटुंबातील चार मतदारांची नावे वेगवेगळ मतदार केंद्रावर येत असून, त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. खारघर शहरात ही समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने गरड यांनी या संदर्भात शहरात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी १०० मदत केंद्र उभारण्याची मागणी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दातात्रेय नवले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्र म, उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात मतदारयादींचे घोळ अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे, अशा परिस्थितीत घराजवळ असलेल्या मतदार केंद्रामध्ये आपले नाव न येता शहराच्या दुसºया टोकाच्या केंद्रात नाव येत असल्याने मतदारांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी गरड यांना दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई