शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खारघर गाव होणार स्मार्ट; ११ कोटींच्या विकासकामांना मंजुरी; नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 01:49 IST

या विकासकामांमध्ये गावांमध्ये विद्युत व्यवस्था, जलकुंभ उभारणे, मुख्य जलवाहिनी टाकणे, विद्युत यांत्रिकी कामे, वाहिन्या जोडणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, भुयारी गटारे बांधणे, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदींचा समावेश आहे

वैभव गायकरपनवेल : झपाट्याने विकसित होणाऱ्या खारघर शहराला ज्या खारघर गावावरून ओळख मिळाली ते गाव अद्यापही मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहिले होते. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्यकाळातदेखील खारघर गावाचा विकास खुंटला होता. पालिकेच्या स्थापनेपासून खारघर गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून खारघर गावाच्या विकासासाठी पालिकेने सुमारे ११ कोटी ३८ लाखांच्या विकासकामाला मंजुरी दिल्याने खारघर गाव स्मार्ट होणार आहे.

या विकासकामांमध्ये गावांमध्ये विद्युत व्यवस्था, जलकुंभ उभारणे, मुख्य जलवाहिनी टाकणे, विद्युत यांत्रिकी कामे, वाहिन्या जोडणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, भुयारी गटारे बांधणे, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदींचा समावेश आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले. प्रवीण पाटील यांनी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपददेखील भूषविले आहे. त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासकामांना चालना मिळाली. लवकरच त्या ठिकाणच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवातदेखील होणार असल्याने खारघर गाव खऱ्या अर्थाने स्मार्ट होणार आहे. खारघर गावात ग्रापंचायतीचे कार्यालय असूनदेखील गावात मूलभूत सुविधा पुरविल्या गेल्या नव्हत्या. या सर्व कामांना सुरुवात होणार असून ग्रामस्थांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने या कामांना मंजुरी मिळाली आहे. खारघर गावावरून शहराला नाव मिळाले असले तरी हे गाव प्राथमिक सुविधांपासून वंचित होते. त्यामुळे या विकासकांमुळे खारघर गाव शहराच्या तोडीस तोड स्मार्ट व्हिलेज होणार आहे.- प्रवीण पाटील, स्थानिक नगरसेवक, खारघर

या कामांचा समावेशया कामांमध्ये विद्युत व्यवस्थेसाठी १ कोटी १७ लाख, ५ लाख लीटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यासाठी १ कोटी ९३ हजार, मुख्य जलवाहिनी १५ लाख रुपये, विद्युत यांत्रिकी कामे ९ लाख ९८ हजार, मलनिःसारण वाहिन्या जोडणे (बाहेरील ) ५१ लाख ८२ हजार , मलनिःसारण वाहिन्या जोडणे (घराजवळ) ८८ लाख ४२ हजार, रस्ते २ कोटी १८ लाख, पावसाळी गटारे २ कोटी ५ लाख, कमी दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे यासाठी २ कोटी २३ लाख खर्च केले जाणार आहेत.

टॅग्स :BJPभाजपा