शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खारघर, तळोजातील हवा आरोग्यास धोकादायक; केटीसी वेल्फेअरची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 06:10 IST

खारघरच्या सेक्टर ३४ बी मध्ये मीटर, मशीन, उच्च दर्जाचे सेंसर्स, हवा तपासणीचे मापक, निरिक्षक यंत्रे १६ जानेवारी रोजी दुपारच्या वेळेत बसवण्यात आली होती.

- वैभव गायकरपनवेल : खारघर, तळोजा शहरातील हवेचा दर्जा अत्यंत सुमार असून ही हवा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचा दावा केटीसी वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या हवेतील चाचणीत उघड झाला आहे. प्रदूषणाची माहिती देणाऱ्या सफर एअर कॉलीटी या आॅनलाईन अ‍ॅपने देखील सोमवारी हवेचा प्रदूषणाचा दर्जा अत्यंत खराब २९६ एवढा दाखविला आहे.खारघरच्या सेक्टर ३४ बी मध्ये मीटर, मशीन, उच्च दर्जाचे सेंसर्स, हवा तपासणीचे मापक, निरिक्षक यंत्रे १६ जानेवारी रोजी दुपारच्या वेळेत बसवण्यात आली होती. तळोजा आणि खारघर सीमेवरील भागात ही यंत्रे बसवली होती. खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशची टीम आणि एसजीएस ( महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व पर्यावरण विभागाची मान्यताप्राप्त प्रयोगशाळा) टीमने विविध ठिकाणावरील हवेची माहिती गोळा केली. एसजीएस टीमने तपासणी ठिकाणांवर दिवस व रात्र हवेच्या दर्जाच्या या यंत्राद्वारे माहिती घेतली. टीमने ८ तासांत तीन नमुने संकलित करण्यात आले. शास्त्रीय पद्धतीने ही माहिती तपासणी यंत्रांमधून जमा करण्यात आली. दुसºया दिवशी हे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एसजीएसने हा अहवाल प्रकाशित केला. मात्र अहवालात दोन्ही शहरातील हवा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आजारांना तोंड द्यावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अहवालातील पीएम २.५ आणि पीएम १० या निकषातून असे निदर्शनास आले आहे की, खारघर व तळोजा दोन्ही शहरातील हवेचा दर्जा तिप्पट खराब आहे.हवेमध्ये घातक अशा कार्बन मोनाक्सईडचे प्रमाण खूप जास्त आहे. एनवो २ चे प्रमाणही खूप मोठे आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दुर्गंधी पसरते. पहाटेपासून दुपारपर्यंतच्या काळात दूषित हवेचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे याच वेळेला शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना जाण्यासाठी लोक घराबाहेर पडतात. मॉनिंग वॉकला देखील नागरिक याच वेळेला मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असतात.या आजारांना निमंत्रणअशा प्रकारच्या दुषीत हवेने श्वसनाचे आजार, दमा, ह्रदयविकार, चिडचिड होणे यांसारखे आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांना गर्भपाताचा धोका होण्याचीही शक्यता या धोकादायक वातावरणात असतो.प्रदूषणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडेतळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणासंदर्भात हरित लवादामध्ये धाव घेतलेले नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या प्रदूषणासंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई