शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

खारघर, नवीन पनवेल, कळंबोली कोरोनाचे हॉटस्पॉट; नागरिकांकडून नियम पाळण्यात हलगर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 08:01 IST

महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून विद्यमान रुग्णांचा आकडा एक हजाराच्या वर गेला असून ही विद्यमान रुग्णसंख्या १११० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रात खारघर शहरात सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ कळंबोली व नवीन पनवेल शहराचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी लागण झाल्याचे समोर येत आहे. मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी हे पनवेल परिसरातून ये-जा करतात. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांच्या संपर्कात कोरोनाबाधित आल्यामुळे कोरोना योद्धेच कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहेत. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सर्व आस्थापना सुरू झाल्याने कोविड रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यात खारघर  परिसरातील सर्वात जास्त म्हणजे आतापर्यंत ३५६ जणांना लागण झाली आहे. नवीन पनवेल  येथे १९२ कोरोनाचे रुग्ण आहेत. या खालोखाल कळंबोलीमध्ये १९९ विद्यमान रुग्ण आहेत.पहिल्या टप्प्यात कोरोनाबाबत घेतली जाणारी खबरदारी दुसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सील करण्यात आलेल्या सोसायट्यांवर पालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. तसेच नागिरकांचे मास्क न घालता फिरणे हेही कोरोना वाढीला आमंत्रण देते आहे. 

कोरोनाबाधित तसेच क्वारंटाइन केलेले नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे  निदर्शनास आले आहे. यामुळेच मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तेथील लोकसंख्या मोठी आहे. नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगडhospitalहॉस्पिटल