शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

खारघर-नेरूळ कोस्टल रोड आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोर्टात

By नारायण जाधव | Updated: February 27, 2023 20:00 IST

सीआरझेडने दिली मंजुरी: सिडकोस मोठा दिलासा

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: खारघर ते नेरूळच्या जलवाहतूक जेट्टीपर्यंतच्या सिडकोने प्रस्तावित केलेल्या कोस्टल रोडला सीआरझेड अर्थात सागर किनारा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. मात्र, प्रस्तावित रस्त्यात होणारी पर्यावरणीय हानी पाहता हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

सीआरझेडच्या १६२ व्या बैठकीत ही मंजुरी मिळाल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. हा प्रस्तावित रस्ता खारघरच्या सेक्टर १६ येथून सुरू होणार असून तो ९.६ किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता सायन-पनवेल महामार्गाला ओलांडून बेलापूर जलवाहतूक जेट्टीलाही जोडण्यात येणार आहे. पुढे तो पाम बीच मार्ग ओलांडून नेरूळ जेट्टीपर्यंत असणार आहे. या मार्गासाठी ३८.४५ हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी २.९८ सध्याचा रस्ता अर्थात १०.२१ हेक्टर जागा सिडकोच्या ताब्यात आहे.

११८२ परिपक्व खारफुटी बाधित- सिडकोने या रस्त्याच्या बांधकामासाठी आदित्य एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेसकडून इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करून तो सीआरझेडला सादर केला आहे. त्यांच्या अहवालानुसार या रस्त्याच्या मार्गात ८.२२ हेक्टर क्षेत्रावरील ११८२ परिपक्व खारफुटीची झाडे बाधित होणार आहेत. त्याबदल्यात त्यांचे सिडको उरण तालुक्यातील न्हावे येथील १२६.८ हेक्टर शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्रोपण करणार आहे.

पक्ष्यांच्या ७२ प्रजातींंचा अधिवास- प्रस्तावित कोस्टल राेड ज्या भागातून जात आहे, तो परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवदेनशील आहे. या परिसरात पक्ष्यांच्या ७२ प्रजातींचा अधिवास असून त्यापैकी ४८ स्थलांतरित आणि २४ स्थानिक पक्षी आहेत. याशिवाय डीपीएस शाळा, एनआरआय कॉम्पलेक्स आणि टी. एस. चाणक्य परिसरात येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०१८-१९ मध्ये ९६४०० असलेली फ्लेमिंगोंची संख्या २०१९-२० मध्ये १३३००० वर गेली होती, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री संस्थेचे निरीक्षण आहे. त्यामुळे हे पक्षी आणि तेथील पर्यावरणची विशेष काळजी घेण्याची सूचना सीआरझेड प्राधिकरणाने मंजुरी देताना केली आहे.

मच्छीमारांची एनओसी घ्या- कोस्टल रोड ज्या खारघर, बेलापूर, दिवाळे, नेरूळ भागातून जात आहे, त्या परिसरात स्थानिक मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करतात. यामुळे त्यांच्या व्यवसायास अडथळा येणार नाही, याची काळजी घेऊन त्यांचेही म्हणणे ऐकून घ्या अशाही सूचना सिडकोस करून हा प्रस्ताव सीआरझेडने तो पुढील मंजुरीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई