शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

खारघर गोल्फ कोर्सवर रंगलेली पार्टी वादात; गवतावर मांडले टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 02:46 IST

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे.

- वैभव गायकरपनवेल : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सोमवारी सर्वत्र पार्ट्या, जल्लोष रंगल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, खारघर गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पात आयोजित करण्यात आलेली न्यू इयर पार्टी वादात सापडली आहे.गोल्फ कोर्स व्हॅली प्रकल्पातील नियम व अटी अतिशय कडक आहेत. गोल्फर्स वगळता या ठिकाणच्या गवतावर चालण्यास सक्त मनाई असताना पार्टीसाठी थेट गवतावर टेबल मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे, गोल्फ कोर्स व्हॅली क्लब आणि पवित्रा यांच्यामार्फत आयोजित पार्टीची रीतसर जाहिरातही करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी ७५० रु पये फी आकारण्यात आली होती.खारघर शहरात सेक्टर २३, २४, २५ या ठिकाणी सुमारे १०३ हेक्टरवर गोल्फ कोर्स प्रकल्प तयार करण्यात आला असून, आॅस्ट्रेलिया येथील मेलबर्न स्थित कंपनीने ते डिझाइन केले आहे. तब्बल ५० कोटी खर्चून या ठिकाणी विविध सोयी-सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये क्लबहाउसचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. गोल्फ संबंधित स्पर्धांच्या आयोजनानंतर खेळाडूसाठी विश्रामगृह, तसेच हॉटेल्सच्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने या क्लबहाउसची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी पार्टी रंगल्याने वाद निर्माण झाला आहे.गोल्फ कोर्सच्या पार्टीसाठी शेकडोच्या संख्येने क्लब हाउसमध्ये नागरिक दाखल झाले होते. यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांचाही सामावेश असल्याचे बोलले जात आहे. सिडकोचे कंपनी सेक्रे टरी प्रदीप रथदेखील पार्टीत सहभागी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सिडकोचे प्रशासक रमेश गिरी यांनी कोणत्या आधारावर या पार्टीला परवानगी दिली, हा प्रश्न उपस्थित होत आहे.गोल्फ कोर्स प्रकल्पात ठिकठिकाणी सूचना फलकदेखील लावण्यात आलेले आहेत.आयपीआय ही कंपनी गोल्फ कोर्स व्हॅलीमधील क्लबहाउसच्या देखरेखीचे काम पाहत आहे. मात्र, या सूचना या पार्टीत पायदळी तुडविण्यात आल्या आहेत.गोल्फकोर्सवर पार्टीचे आयोजन करणारे आणि परवानगी देणाºयांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर याप्रकरणी कारवाई करण्यात येईल.- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडकोगोल्फ कोर्समध्ये आयोजित पार्टीबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.- प्रिया रातंबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई