शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीतील शासकीय वसाहतींची दुरवस्था, सांडपाण्यामुळे दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:46 IST

कळंबोलीमधील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधील पाणी गटारामधून बाहेर आले असून पूर्ण वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे.

- शैलेश चव्हाण तळोजा : कळंबोलीमधील शासकीय वसाहतीची दुरवस्था झाली आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधील पाणी गटारामधून बाहेर आले असून पूर्ण वसाहतीमध्ये दुर्गंधी पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कळंबोली सेक्टर ४ ई या ठिकाणी सध्या शासकीय वसाहतींच्या आवारात मलनि:सारण वाहिन्यांमधील पाणी बाहेर आले आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. रहिवाशांनी या समस्येविषयी वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु तक्रारींची योग्य दखल घेतली जात नाही. मलनि:सारण वाहिन्यांची दुरुस्ती केली जात नाही. घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिसरामध्ये डेंग्यू व मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशभर स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अभियान राबविले जात आहे, परंतु सरकारी वसाहतीमध्ये मात्र या अभियानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. कळंबोली या ठिकाणी असलेल्या शासकीय वसाहतींचे सध्या बांधकाम विभागाच्या भिंगारी विभागाकडून स्ट्रक्चरल आॅडिट केले जात आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आखडता हात घेतला आहे.या ठिकाणी एकूण २२ इमारती आहेत. या इमारतीत राहणारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा घरभाडे कापले जाते, मात्र कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवली जात नाही. जीर्ण झालेल्या इमारतींचे स्लॅब, घरात होणारी स्लॅबची पडझड, किडे, उंदीर, घुशी यांचा नाहक त्रासात वर्षानुवर्षे हे कर्मचारी मूग गिळून राहत आहेत, मात्र कोणतीही दखल अद्याप घेतली जात नाही. याबाबत लवकरच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनीच आता आम्हाला न्याय द्यावा अशी कळकळीची विनंती येथील रहिवासी करताहेत. घाण व दुर्गंधीमुळे वसाहतीमधील नागरिकांचे आरोग्य बिघडले, डेंग्यू व मलेरियामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत.वारंवार तक्र ारी करून देखील दखल घेतली जात नाही. सध्या मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे. लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.- धनाजी सकपाळ,अध्यक्ष,राज्य शासकीय वसाहतकळंबोलीशासकीय वसाहतींच्या डागडुजीबाबत लवकरात लवकर आॅडिट करून येथील कामे केली जातील.- गोपीनाथ मोहिते,अधीक्षक अभियंतासा.बां. विभाग बेलापूरया ठिकाणी साचत असलेले पाणी यावर उपाययोजना करण्यासाठी लवकरच दखल घेऊन दोन महिन्यात या कामाची पूर्तता करू.- आर. आर. पाटील,कार्यकारी अभियंताभिंगारी