शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:12 IST

सिडकोने नवी मुंबईसाठी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टा व रायगडमधील पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांतील सर्व जमिनी संपादित केल्या.

- अनंत पाटील नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबईसाठी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टा व रायगडमधील पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांतील सर्व जमिनी संपादित केल्या. मात्र, येथील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर राहण्यासाठी बांधण्यात आलेली हजारो घरे अनधिकृत ठरविण्यात आलेली आहेत. नवी मुंबईच्या उभारणीसाठी आपले सर्वस्व असलेल्या जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांनी गावठाणाबाहेरील घरे नियमित करण्याच्या घोषणा राज्य शासनाने केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी ४२ वर्षांचा कालावधी उलटूनही झालेली नाही, त्यामुळे येथील भूमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे.१७ मार्च १९७० साली मुंबईचा भार कमी करण्यासाठी सरकारने नवी मुंबई उभारणीचा निर्णय घेतला होता. संपूर्ण जमिनी संपादित केल्याने शेतकºयांकडे जमीनच शिल्लक नसल्याने त्यांच्या वारसांनी वाढत्या लोकसंख्येनुसार सिडको संपादित जागेवर राहण्यासाठी घरे बांधली. जमिनी सिडकोच्या मालकीच्या असल्याने सिडकोने ही घरे अनधिकृत ठरवली. तर दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येला घरांची व्यवस्था व्हावी, याकरिता दर दहा वर्षांनी दिल्या जाणाºया गावठाण कायद्याची अंमलबजावणी सरकारने केली नाही, त्यामुळे या घरांची संख्या वाढत गेली. अनेक बांधकामे सिडकोच्या आराखड्यातच बांधण्यात आलेली आहेत. २५ फेब्रुवारी १९७६ रोजी नवी मुंबईतील तुर्भे, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे आणि शिरवणे या पाच गावांचा गावठाण विस्तार करण्यात आला.३ आॅक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत नवी मुंबई आणि रायगड येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनाच्या पदाधिकाºयांची मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत संपादित जमिनीच्या १५ टक्के भूखंडाची मागणी करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १५ टक्केऐवजी अखेर साडेबारा टक्के योजना लागू करण्याचा निर्णय ६ मार्च १९९० रोजी घेतला आणि २८ आॅक्टोबर १९९४ रोजी कोपरखैरणे येथे आयोजित शेतकरी भूमिपुत्रांच्या मेळाव्यात जाहीर केले. तेव्हापासून साडेबारा टक्के योजना नवी मुंबईत लागू झाली आहे. त्याची अंमलबजावणी मागील २८ वर्षांत आजही अपूर्ण अवस्थेत आहे.>कुटुंबाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर घरे बांधलेली असून पर्यायाने काही मोडकळीस आलेली घरे दुरु स्ती करायचे ठरवले तर सिडको कारवाई करते,यासाठी राज्य शासनाने त्वरित गावठाण विस्तार योजनेचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे.- मनोहर पाटील,अध्यक्ष,सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती>नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता २२६८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यापैकी उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी, चिंचपाडा, कोल्हीकोपर, वरचे ओवळे, पारगाव-डुंगी, वाघिवली-वाडा आणि वाघिवली या दहा गावच्या प्रकल्पग्रस्तांची ६७१ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. मात्र, सिडकोने दिलेल्या आश्वासनानुसार अनेक लोकांचे पुनर्वसन झालेले नसून समस्यांना सामोरे जावे लागत आहे.- पुंडलिक म्हात्रे, उपाध्यक्ष,नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ प्रकल्पग्रस्तपुनर्वसन बाधित संघर्ष समिती