शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगर येथे लुटारूने तरुणीला रेल्वेतून ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 04:37 IST

लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार जुईनगर रेल्वे स्थानकात घडला.

नवी मुंबई : लुटारूला विरोध करणा-या तरुणीला चालत्या रेल्वेतून ढकलून दिल्याचा प्रकार जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर वाशीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वेच्या डब्यात तरुणी एकटीच असल्याची संधी साधून तिला लुटण्याचा प्रयत्न करणाºया लुटारूसोबत झालेल्या झटापटीत हा प्रकार घडला आहे.ऋतुजा बोडके (१९) हिच्यासोबत हा प्रकार घडला असून, ती बडोदा येथून पनवेलमार्गे रेल्वेने वाशीला येत होती. रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास रेल्वे नेरूळ स्थानकात आली असता, महिला डब्यात ती एकटीच असल्याची संधी साधून एका इसमाने महिला डब्यात प्रवेश केला. या वेळी त्या ठिकाणी रेल्वे पोलीसही कार्यरत नव्हते. यामुळे काही वेळानंतर त्याने ऋतुजाला लुटण्याच्या उद्देशाने धमकावत तिच्याकडील दोन मोबाइल व कानातले सोन्याचे झुमके खेचून घेतले. ऋतुजाने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याने नेरूळ ते जुईनगर दरम्यान सुमारे तीन मिनिटे त्यांच्यात झटापट सुरू होती. अखेर काही अंतरावर जुईनगर स्थानक आल्यामुळे पकडले जाऊ या भीतीने सदर लुटारूने ऋतुजाला चालत्या रेल्वेतून ढकलून दिले. तसेच फलाट येताच उडी टाकून त्यानेही पळ काढला.गंभीर दुखापतरेल्वेतून तरुणी पडल्याचे निदर्शनास येताच प्रत्यक्षदर्शी व मोटरमन यांनी तिला तत्काळ उपचारासाठी वाशीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेमध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे.चोरट्याविषयी अधिक कसलीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जुईनगर व नेरूळ स्थानकातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा