शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

फीवाढीविरोधात जेएनपीटी प्रशासनाला घेराव

By admin | Updated: June 25, 2017 04:08 IST

जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या इंडियन एज्युकेशन संस्थेच्या शाळेने भरमसाठ फीवाढ रद्द करावी, बंद केलेली बससेवा सुरू करावी आणि इतर विविध मागण्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटीअंतर्गत सुरू असलेल्या इंडियन एज्युकेशन संस्थेच्या शाळेने भरमसाठ फीवाढ रद्द करावी, बंद केलेली बससेवा सुरू करावी आणि इतर विविध मागण्यांसाठी संतप्त झालेल्या पालक, विद्यार्थ्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटी प्रशासन भवनाला घेराव घातला. जेएनपीटी चेअरमन, प्रशासन अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत तीन तासांहून अधिक वेळ घेराव घातला. त्यामुळे प्रशासन भवनाचा मार्ग बंद झाल्याने अनेक कर्मचारी इमारतीच्या आत बाहेरच अडकून पडले. शालेय पालक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार बैठकीसाठी तारखा देऊनही गैरहजर राहणाऱ्या जेएनपीटी चेअरमन अनिल डिग्गीकर आणि प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन केल्याने अखेर जेएनपीटी प्रशासन वठणीवर आहे. यासंदर्भात मंगळवारी (२७ जून) बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जेएनपीटी कामगार वसाहतीमध्ये इंडियन एज्युकेशन संस्थेचे विद्यालय, महाविद्यालय आहे. या शाळेत सुमारे ३५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शाळेत गैरसोयी आहेत. बाहेरून सुसज्ज, सुंदर दिसणाऱ्या शाळेच्या इमारतीतील अनेक वर्गांच्या स्लॅबला गळती लागलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अस्वच्छ आहेत. पाण्याच्या टाक्यात मेलेले बेडूक, पक्षी आढळून येत असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्यच धोक्यात येऊ लागले आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेले बेंच निम्म्याहून अधिक मोडकळीस आले आहेत. शाळेत बंदर कामगारांची १५६ मुले वगळता उर्वरित विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. त्यांच्यासाठी सुरू असलेल्या बसेस जेएनपीटी प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बंद केल्या आहेत. त्यामुळे शाळेला सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था नसल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे. इमारत दुरुस्ती आणि शाळेला सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी जेएनपीटी प्रशासनाची आहे. मात्र, त्याकडे जेएनपीटी प्रशासन सातत्याने दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप शालेय पालक संघर्ष समितीचा आहे.