शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

नोकरीच्या बहाण्याने फसवणूक, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:21 IST

पैसे घेऊन नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे.

पनवेल : पैसे घेऊन नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. मनोज चौगुले असे आरोपीचे नाव आहे. शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला अटक केली असून, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एल अ‍ॅण्ड टी कंपनीमध्ये व्यवस्थापक व विजय चौगुले यांचा नातेवाईक असल्याचे सांगून मनोज चौगुले हा रोजगार मेळाव्याच्या फेसबुक पेजवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरायचा. त्यांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन त्यांचे दूरध्वनी क्रमांक मिळवायचा.पनवेलमधील एका महिलेला एल अ‍ॅण्ड टी कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध झाली आहे, या ठिकाणी आपले सिलेक्शन झाले आहे, तसेच आपले अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर आपल्याला तत्काळ याबाबत हजर व्हावे लागेल, असे सांगितले. मात्र, यासाठी कंपनीचा ड्रेस तयार करण्याचा असून ड्रेससाठी पाच हजार ५०० रुपये खात्यामध्ये भरल्यानंतर आपण हजर होताच चौथ्या दिवशीच पैसे परत रोख स्वरूपात दिले जातील, असे त्याने सांगितले. मात्र, कोणतीही नोकरी व पैसे परत न मिळाल्याने सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांद्वारे आरोपीचा माग काढून त्याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.>पनवेल पोलिसांचे नागरिकांना आवाहनपनवेल शहर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुण - तरुणींना गंडा घातला असल्याचे तपासात समोर येत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी आपल्याशी संपर्क साधून पैसे मागत असेल अथवा मागितले असतील तर सुजाण नागरिक बनून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.