शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या अधिका-यांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 05:54 IST

उरण (रायगड) : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल प्रा. लि. (सिंगापूर पोर्ट), जेएनपीटी आणि सिडको प्रकल्पग्रस्त समिती यांच्यात नुकतीच संयुक्त बैठक झाली होती. या वेळी प्रकल्प अधिकाºयांना समितीच्या नेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक प्रशांत पाटील यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.या निंदनीय प्रकाराचा सिंगापूर पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक ...

उरण (रायगड) : भारत मुंबई कंटेनर टर्मिनल प्रा. लि. (सिंगापूर पोर्ट), जेएनपीटी आणि सिडको प्रकल्पग्रस्त समिती यांच्यात नुकतीच संयुक्त बैठक झाली होती. या वेळी प्रकल्प अधिकाºयांना समितीच्या नेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी सर्वपक्षीय समितीचे निमंत्रक प्रशांत पाटील यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे.या निंदनीय प्रकाराचा सिंगापूर पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक माईक फार्मोसी आणि जेएनपीटीचे चेअरमन अनिल डिग्गीकर यांनी जाहीर निषेध केला आहे. यापुढे प्रकल्प अधिकाºयांसोबत प्रकल्पग्रस्तांच्या समितीकडून केलेला हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.जेएनपीटी बंदरांतर्गत उभारल्या जाणाºया सर्वात मोठ्या ‘सिंगापूर पोर्ट’मध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, अशी समितीची मागणी आहे. या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचा जेएनपीटी आणि सिंगापूर पोर्ट यांच्यात सहा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. दरम्यानच्या काळात सिंगापूर पोर्ट अधिकाºयांनी ४० परप्रांतीय कामगारांची भरती केली. यामुळे प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांच्यातील वाद चिघळला. यावर तोडगा काढण्यासाठी १० आॅगस्ट रोजी जेएनपीटी आणि सर्वपक्षीय जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त समिती यांच्यात संयुक्त बैठक बोलावली होती. जेएनपीटी, सिंगापूर पोर्टचे वरिष्ठ अधिकारी आणि भाजपावगळता समितीचे अन्य सदस्य, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. समितीचे निमंत्रक तथा राष्टÑवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी प्रकल्प अधिकारी सुरेश आमीर आप्पो, दत्ताजी जगताप आणि इतर उपस्थित अधिकाºयांना शिवीगाळ केली. तसेच प्रकल्प अधिकाºयांना मारहाण करीत दिलेल्या धमक्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. या प्रकरणी न्हावा-शेवा पोलिसात जेएनपीटी अधिकारी एन. के. कुलकर्णी यांनी तक्रार केली होती.>संयुक्त निवेदनाद्वारे इशाराडिसेंबरअखेरीस कार्यान्वित होणाºया देशातील सर्वाधिक लांबीच्या अत्याधुनिक बंदराच्या कोणत्याही कामात भविष्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करतानाच यापुढे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जेएनपीटी आणि सिंगापूर पोर्ट यांनी संयुक्त निवेदनाद्वारे दिला आहे.