शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर धडक

By admin | Updated: January 6, 2017 05:21 IST

डिजिटल, डीपीडी धोरणाविरोधात हजारो कामगारांनी निषेध व्यक्त करीत, जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर धडक दिली. केंद्र सरकारने लागू केलेले कामगार विरोधी धोरण रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही

उरण : डिजिटल, डीपीडी धोरणाविरोधात हजारो कामगारांनी निषेध व्यक्त करीत, जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर धडक दिली. केंद्र सरकारने लागू केलेले कामगार विरोधी धोरण रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही नोकरी व व्यवसाय बचाव आंदोलनकर्त्यांचे मार्गदर्शक माजी आमदार विवेक पाटील यांनी केंद्र सरकारला दिला.केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांमुळे जेएनपीटी बंदर आणि परिसरातीलच शेकडो कंटेनरयार्ड, सीएफएसमध्ये काम करणाऱ्या सुमारे २५ हजार कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याविरोधात सर्वपक्षीयांनी संघटित होऊन नोकरी व व्यवसाय बचाव आंदोलनकर्त्यांनी विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जेएनपीटीच्या कस्टम हाऊसवर हल्लाबोल आंदोलन केले. करळ फाट्यावरून सुरू झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात सर्वच राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या कामगार संघटना, नागरिक आणि महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी कामगार विरोधी डिजिटल व डीपीडी धोरणाच्या नोटिफिकेशन कागदपत्रांची होळी करीत केंद्र सरकारचा धिक्कार केला. कस्टम हाऊस जवळील पोर्ट युजर्स बिल्डिंगच्या समोरील ऐश्वर्य पार्किंगमधील प्रांगणात आंदोलनकर्त्यांची सभा झाली. सभेसाठी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख बी.एन.डाकी, कामगार नेते आमदार भाई जगताप, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, नरेंद्र पाटील, श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, भूषण पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, तुकाराम कडू तसेच विविध कामगार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना मनोहर भोईर म्हणाले, सत्तेत असलो तरी जनतेचा आमदार म्हणून नागरिक, कामगार, कष्टकरी आणि सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कायम जनतेसोबतच राहील, अशी ग्वाही दिली. आंदोलनाला कामगार नेते आमदार भाई जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला. तर माथाडी कामगार नेते गुलाब जगताप यांनी वेळ पडल्यास राज्यातील माथाडी कामगार संघटना सीएफएसचे कामकाज बंद पाडतील असा इशारा दिला. (वार्ताहर)