शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएचा खाडीत १४०० मीटर भराव, मासेमारीसह जैवविविधता धोक्यात; ‘हरित लवादा’चे कार्यवाहीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 07:46 IST

न्हावा-शेवा खाडीच्या मुखाशीच जेएनपीएने बंदराचा विस्तार केला आहे. यासाठी ५२० हेक्टर पारंपरिक खाजण क्षेत्रात दगड-मातीचा भराव टाकला आहे.

उरण : ठाण्याची उपखाडी म्हणून ओळखली जाणारी न्हावा-शेवा खाडी जेएनपीएने भराव टाकून बुजविल्याने या खाडीचे पूर्वीचे १५०० मीटर रुंदीचे मुख आता १०० मीटरवर आले आहे. यामुळे समुद्राच्या नैसर्गिक भरतीचे संतुलन व प्रवाह बिघडल्यामुळे विविध जैवविविधता आणि स्थानिक मासेमारी धोक्यात आली आहे. याबाबत मच्छीमार संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता राष्ट्रीय हरित लवादाने पडताळणी करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

न्हावा-शेवा खाडीच्या मुखाशीच जेएनपीएने बंदराचा विस्तार केला आहे. यासाठी ५२० हेक्टर पारंपरिक खाजण क्षेत्रात दगड-मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे हे खाडीमुख जवळपास ९४ टक्के बंद झाले आहे. त्यातही येथील न्हावा-माणकटोक खाडीचे मुख तर जवळपास बंदच झाले आहे. यामुळे या खाडी क्षेत्रात येणारे भरतीचे पाणी व  नैसर्गिक लाटांचा वेग मंदावलाय. त्यातूनच खुल्या समुद्रातून खाडी क्षेत्रात येणाऱ्या माशांची आवक व पैदासही प्रचंड घटली आहे. त्याचा खारफुटीसह येथील    जैवविविधतेवर विपरित परिणाम झाला आहे.

योग्य कार्यवाही कराअधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर संबंधित मच्छीमार संस्थांनी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयाकडे केलेली मागणी योग्य असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने येथील याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती माहिती महाराष्ट्र स्मॉल स्केल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष व पर्यावरणवादी नंदकुमार पवार यांनी दिली.

शासकीय अधिकाऱ्यांकडून परिसराची पाहणीया पार्श्वभूमीवर पारंपरिक मच्छीमार बचाव सामाजिक कृती समिती व गव्हाण कोळीवाडा मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेने  जेएनपीए, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटी, रायगड जिल्हाधिकारी, पर्यावरण विभाग यांच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन हरित न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि डॉ. विजय कुलकर्णी यांनी संबंधित विभागांना तातडीने पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची नुकतीच पाहणी केली.