शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधितांच्या तक्रार निवारण प्रक्रियेला येणार वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 04:37 IST

दोन महिन्यांत समितीच्या सहा बैठका; १८६ प्रकरणांच्या पुनर्विलोकनाचे काम पूर्ण

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिडकोने विशेष समिती गठीत केली आहे. दोन महिन्यांत या समितीच्या सहा बैठका पार पडल्या आहेत. यात पूर्वीच्या समितीने अमान्य केलेल्या प्रकल्पग्रस्त बांधकामधारकांच्या १८६ तक्रारींचे पुनर्विलोकन करण्यात आले आहे.स्थलांतरित होणाºया दहा गावांतील ग्रामस्थांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार पुनर्वसन पॅकेज दिले जात आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार या पुनर्वसन पॅकेजमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही दहा गावांतील अनेक बांधकामधारकांच्या तक्रारी येत होत्या.या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीने प्राप्त झालेल्या ३६० तक्रारी वर्ग करून गावनिहाय सुनावणी करून अहवाल तयार केला होता. त्यापैकी १८६ तक्रारी अमान्य करण्याची शिफारस समितीने केली होती. तसे संबंधितांनाही कळविण्यात आले होते; परंतु अमान्य केलेल्या प्रकरणांचेही पुनर्विलोकन करण्याची विनंती दहा गाव संघर्ष समितीने केली होती. व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सदर प्रकरणांची पुनर्तपासणी करण्याचे मान्य करीत त्यासाठी विशेष समिती गठीत केली आहे. या विशेष पुनर्विलोकन समितीने मागील दोन महिन्यांत सहा बैठकांच्या माध्यमातून १८६ तक्रारींचे पुनर्विलोकन केले. यात प्रकल्पग्रस्त व सिडकोचे म्हणणे एकूण घेण्यात आले, तसेच उपलब्ध साक्षीपुरावे तपासण्यात आले आहेत.हा अहवाल लवकरच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना सादर केला जाणार आहे. त्यावर व्यवस्थापकीय संचालक काय निर्णय घेतात, याकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.विशेष समितीची वैशिष्ट्येभारतीय प्रशासनातील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समितीत आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील, प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष नाथा पाटील, सचिव बाळकृष्ण झुगे, सल्लागार आर. सी. घरत, कामगारनेते महेंद्र घरत व पत्रकार प्रतिनिधी म्हणून मनोज जानावाला यांचा या समितीत समावेश आहे. त्याचप्रमाणे या समितीत सिडकोचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी अजिंक्य पडवळ, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वंदना सूर्यवंशी व मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (विमानतळ) विजय पाटील या शासकीय अधिकाºयांचाही समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई