शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना अनियमित पाणीपुरवठा, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:06 IST

शहराच्या विविध भागात सकाळपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुरेशी माहिती दिली न गेल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

नवी मुंबई : शहराच्या विविध भागात सकाळपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुरेशी माहिती दिली न गेल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही, तर काही भागात एकच वेळा आणि तोही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांचे हाल झाले.मोरबे धरणाच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. दुरुस्तीच्या कालावधीत सोमवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे सूचित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा न झाल्याने रहिवाशांत तारांबळ उडाली. कोपरखैरणे, घणसोलीसह वाशी व नेरूळ परिसरातही दिवसभर अनियमित पाणीपुरवठा सुरू होता. संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवाशांनी पाण्यासाठी जवळच्या जलकुंभावर गर्दी केली होती. शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अशात पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने नागरिकांत नाराजीचा सूर दिसून आला. दरम्यान, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने त्यात पुन्हा बिघाड झाला. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. असे असले तरी सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोपरखैरणे) संजय देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Waterपाणी