शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

खांदेश्वर स्थानकासमोरील लोखंडी पत्रे काढले; शिवसैनिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:22 AM

कामोठेकडे जाणारा मार्ग केला मोकळा

कळंबोली : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर इमारती बांधण्यात येणार आहेत. याकरिता पत्रे लावून कामोठेकडे जाणारा रस्ता अडवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे आणि शिवसैनिकांनी या ठिकाणचे पत्र काढून प्रवाशांना रस्ता मोकळा करून दिला. शिवसेना आक्रमक होत असल्याचे पाहून संबंधित एजन्सी नरमल्याचे दिसून आले.

बस आणि ट्रक पार्किंगच्या वर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडको इमारती बांधणार आहे. त्यामध्ये खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील बस टर्मिनस आणि पार्किंगच्या जागेचाही समावेश आहे. या जागेवर १५ दिवसांपूर्वी इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने पत्रे टाकले. तसेच या भागात साइड आॅफिसकरिता कंटेनर आणले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्या इमारती या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. त्याला कामोठेकरांनी विरोध दर्शवला आहे.

सामाजिक संस्थांनी विरोधात आवाज उठवला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन पंतप्रधान आवास योजना अंतर्गत उभारण्यात येणारा हा प्रकल्प दुसरीकडे हलवावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेसुद्धा यामध्ये आघाडी घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता रामदास शेवाळे यांच्यासह कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी, कळंबोली शहरप्रमुख नीलेश भगत, आत्माराम गावंड, कृष्णकांत कदम, बबन काळे, विलास कामोठकर, संदीप प्राध्ये, संतोष पडळकर, गुलाब भोर, धाया गोवारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जाऊन कामोठे शहर तसेच नौपाडाकडे जाणारा रस्ता पत्रे लावून अडवण्यात आला होता.

तेथील पत्रे काढून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तो जनतेसाठी खुला करून दिला. सर्वसामान्यांच्या मागणीचा विचार करीत एजन्सीने कटरच्या साह्याने पत्रे आणि लोखंडी खांब काढून घेतले. यामुळे रेल्वे स्टेशनला जाणाºया-येणाºया रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.सिडकोने सतत आणि कायम मनमानी केली. त्यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरच पंतप्रधान आवास योजनेचे घरे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. याविषयी त्यांनी रहिवाशांना विश्वासात घेतले नाही, तसेच त्यांचा रस्ताही बंद करून टाकला. सिडको जनसामान्यांची अशाप्रकारे अवहेलना करत असेल, तर शिवसेना ते खपवून घेतले जाणार नाही. याच भावनेतून आम्ही खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर अडवलेला रस्ता मोकळा करून दिला आहे.- रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख, शिवसेना 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई