शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीसह माती उत्खननाची चौकशी करा; सीबीडीतील रहिवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:44 IST

पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ मध्ये संरक्षण भिंत बांधताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून येथील मातीचीही अवैधपणे वाहतूक करण्यात आली असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली असून याविषयी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.बेलापूरमध्ये पावसाळ्यात डोंगराचा काही भाग खचून कल्पतरू सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली होती. पावसाचे पाणी व रेती इमारतीच्या आवारात शिरले होते. सदर ठिकाणी महानगरपालिकेने संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. संरक्षण भिंत बांधताना डोंगर उतारावरील अनेक वृक्ष तोडण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. उतारावरील माती डम्परमध्ये भरून इतर ठिकाणी नेण्यात आली आहे. माती इतर ठिकाणी घेऊन जाण्यास रहिवाशांनी विरोध केला आहे. निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यात यावा. वृक्षतोड व माती वाहतुकीची चौकशी करण्यात यावी. नियमबाह्यपणे काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याविषयी पत्रव्यवहार सुरू केला आहे.