शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:05 IST

पनवेलमधील प्रभाग क्रमांक १९ साठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार रुचिता लोंढे या विजयी झाल्या आहेत.

पनवेल : पनवेलमधील प्रभाग क्रमांक १९ साठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार रुचिता लोंढे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या स्वप्नल कुरघोडे यांचा पराभव केला.गुरुवारी पार पडलेल्या मतदानावेळी केवळ ३१.३ टक्के मतदान झाले होते. सध्या सर्वत्र महाविकास आघाडीचे वारे असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे चुरशीची लढत रंगल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. मात्र, भाजपच्या उमेदवार रुचिता लोंढे यांना मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. ८,७९६ मतांपैकी रुचिता लोंढेंना ६,२३१ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल कुरघोडे यांना २,३८७ मते मिळाली. १७८ मतदारांनी नोटाला पसंती दिली. या मतदारसंघात एकूण २८,३५० मतदार आहेत. यापैकी केवळ ८,७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारांचा या मतदाना वेळी निरुत्साह दिसून आला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर प्रथमच पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.आमदार प्रशांत ठाकूर प्रचारात जातीने लक्ष देऊन होते. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने मतदारांमध्येही लोंढे कुटुंबीयांबद्दल सहानुभूती होती. मतदारांनी ती मतदानातून दाखवून दिल्याचे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले.पनवेल महापालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला ही निवडणूक लढण्याची संधी दिली. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना पनवेल महानगरपालिकेत आपले खाते उघडेल, अशी महाविकास आघाडीची धारणा होती.>मतमोजणी केंद्रालाछावणीचे स्वरूपमतदानाच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी शेकाप कार्यकर्त्या अविनाश मकासला मारहाण केल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने या घटनेचे पडसाद मतमोजणी केंद्रावर उमटू नये म्हणून मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.