शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
2
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
3
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
4
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
5
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
6
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
7
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
8
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
9
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
10
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
11
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
12
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
13
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
14
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
15
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
16
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
17
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
18
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
19
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
20
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

डान्स बारसाठी निरीक्षकांना जबाबदार धरणार, महासंचालक कार्यालयाने मागवला अहवाल

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 4, 2024 08:16 IST

Navi Mumbai: अवैधरीत्या डान्स बार चालत असल्यास त्याला स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल महासंचालक कार्यालयाने सर्व पोलिस आयुक्तालयांतून मागवला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - अवैधरीत्या डान्स बार चालत असल्यास त्याला स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल महासंचालक कार्यालयाने सर्व पोलिस आयुक्तालयांतून मागवला आहे. त्यामुळे पूर्ण ताकदीने डान्स बारवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित आयुक्तांना दिले आहेत. लोकमतने नवी मुंबईतील डान्स बारची अनागोंदी चव्हाट्यावर आणल्यानंतर  पोलिस महासंचालकांनी हे पाऊल उचलले आहे.

नवी मुंबईसह मुंबई, ठाणे व राज्याच्या इतर काही प्रमुख शहरांमध्ये डान्स बार चालवले जात आहेत. ऑर्केस्ट्रा बारची परवानगी मिळवून प्रत्यक्षात महिला वेटर नाचवल्या जात आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील पोलिस आयुक्तांकडे डान्स बारवरील कारवाईचा आढावा मागवला आहे, तसेच ज्या ठिकाणी विनापरवाना डान्स बार चालत असेल तिथल्या वरिष्ठ निरीक्षकांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही सांगितले आहे. याचा धसका सर्वच पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यातून नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात डान्स बारवर सातत्याने कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामध्ये काही बारमध्ये नमूद असलेल्या अटी शर्तींचा बेधडक भंग होताना दिसत आहे. तीन दिवसांपूर्वी ऐरोली परिसरातील एका बारवर उत्पादन शुल्क विभाग ठाणेच्या पथकाने पहाटे तीन वाजता कारवाई केली होती. तर शिरवणे परिसरातल्या डान्स बार कारवाईत सर्वच अधिकारी हात आखडते घेत आहेत. 

वरिष्ठांना सांभाळायचे की खुर्चीला?-अनेकदा स्थानिक अधिकाऱ्याची इच्छा नसतानाही वरिष्ठांची मर्जी म्हणून डान्स बारसह इतर अवैध धंद्यांना सूट दिली जाते. मात्र, कारवाईची वेळ आल्यास खालच्या अधिकाऱ्यांचाच बळी द्यायचा का? अशी खंत पोलिस निरीक्षकांकडून व्यक्त होत आहे.- त्यामुळे अवैध धंद्यावर कारवाई केल्यास मीटर बंद झाल्याची वरिष्ठांची नाराजी ओढावून घ्यायची, नाही कारवाई केली तर, खुर्ची धोक्यात घालायची या अवस्थेत अधिकारी आहेत.

उत्पादन शुल्क विभागाकडून बारला परवाना दिला जात असून त्यामध्ये अटींचे पालन करणेही बंधनकारक आहे. पोलिसांनी कारवाया केल्यास त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून महसुलावर परिणाम होत असल्याचा ठपका ठेवला जातो. मात्र, डान्स बारवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई का होत नाही?   

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस