शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शासनाच्या पथकाकडून नेरूळच्या पाणथळींची पाहणी; शासनास अहवाल देणार

By नारायण जाधव | Published: March 08, 2024 3:01 PM

पर्यावरणप्रेमींनी केले स्वागत, नेरूळ येथील पाणथळी आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र वाचविण्यासाठी नवी मुंबईकरांनी तीव्र लढा सुरू केला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारुप विकास आराखड्यात नेरूळच्या एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळींच्या जागेवर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांची परवानगी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पथकाने गुरुवारी या पाणथळींची पाहणी केली. हे पथक पाहणी केल्यानंतर स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींचे म्हणणे ऐकून तसा अहवाल शासनास सादर करणार असल्याची माहिती यासाठी पाठपुरावा करणारे पर्यावरणप्रेमी नागरिक सुनील अगरवाल यांनी दिली. मात्र, ज्या मिस्त्री कन्स्ट्रक्शनने येथील हिरवळीवर बांधकाम सुरू ठेवले आहे, त्यांचे पर्यवेक्षकही शासनाच्या पथकासह सोबत असल्याने अगरवाल यांनी नाराजी व्यक्त केली.

नेरूळ येथील पाणथळी आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र वाचविण्यासाठी नवी मुंबईकरांनी तीव्र लढा सुरू केला आहे. असे असताना नवी मुंबई महापालिकेेने राज्याचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक यांचे, जिल्हाधिकारी यांचे निर्देश आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अव्हेरून आपल्या प्रारुप विकास आराखड्यात एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळींवर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केली आहेत. महापालिकेचा हा निर्णय अवसानघातकी असून, शहराचे पर्यावरण बिघडविणारा असल्याची टीका सर्व थरातून होत आहे. याची दखल घेऊन शासनाच्या पथकाने या पाणथळींची गुरुवारी दिवसभर पाहणी केली.जिल्हानिहाय करणार पाहणीशासनाचे पथक नवी मुंबईतील पाणथळींसह राज्यातील जिल्हानिहाय सर्वच पाणथळींची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर ते शासनास आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली असल्याचे अगरवाल यांनी लोकमतला सांगितले.

महापालिकेने आपल्या २०१८-१९ च्या पर्यावरणस्थिती अहवालातही शहरात २४.२२ टक्के वन, १२.२८ टक्के पाणथळी, ०.३२ टक्के तलाव क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता याच १२.२८ टक्के पाणथळींचा महापालिकेने आपल्या प्रस्तावित प्रारुप विकास आराखड्यात नकार दिला आहे. हे खूपच संतापजनक आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी