शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गाडीची तपासणी, अपघातांना हुलकावणी; नवी मुंबई, वसईसह २० आरटीओत वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र

By नारायण जाधव | Updated: May 11, 2023 05:05 IST

या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च  करण्यात येणार आहेत.

नारायण जाधव

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई, वसई आरटीओ कार्यालयांसह राज्यातील २० आरटीओंच्या कार्यक्षेत्रात  वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र सुरू करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. या कार्यालयांवर ३६२ कोटी ५२ लाख रुपये खर्च  करण्यात येणार आहेत. मालकीच्या, एसटी महामंडळाच्या जागांना त्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

केंद्रांमध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, साांगली, अकलूज, गडचिरोली, कराड, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, सिंधुदुर्ग, नागपूर (पूर्व) यांचाही समावेश आहे.

फिटनेस चाचणीवरून मुंबई उच्च न्यायालयाने आरटीओ अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यानंतर राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने राज्यात ही वाहन निरीक्षण-परीक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यांची होते तपासणी

गाडीचे लाइट, ब्रेक, टायर, इंजिन आदींची संपूर्ण तपासणी होते. टेस्ट ट्रॅकवर गाडी चालवून पाहिली जाते. त्यानंतरच आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात येते.

दरवर्षी रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या मोठी असून गाडी चांगल्या स्थितीत नसणे हेदेखील अपघाताचे कारण ठरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांची फिटनेस चाचणी  काटेकोरपणे करणे महत्त्वपूर्ण असते. यामुळे स्वयंचलित यंत्रणेमार्फत तपासणी या वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्रांत करणे सोपे होईल.