शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भेतील अघोरी प्रकाराची चौकशी सुरू

By admin | Updated: June 25, 2016 02:08 IST

तुर्भे नाका हनुमाननगरमधील अघोरी प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक व परिसरातील रहिवाशांकडून माहिती घेत आहे.

नवी मुंबई : तुर्भे नाका हनुमाननगरमधील अघोरी प्रकारामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरमालक व परिसरातील रहिवाशांकडून माहिती घेत आहे. झोपडपट्टीच्या टेकडीवर असणाऱ्या घरामध्ये चार दिवसांपासून खड्डा खोदला जात होता. रोज रात्री घरामध्ये खड्डा करण्याचे काम सुरू केले जात होते. बुधवारी रात्री घरामध्ये पूजेचे साहित्य खड्ड्याजवळ ठेवले असल्याचे नागरिकांनी पाहिले. काहीतरी अघोरी प्रकार होत असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी घरामध्ये जावून विचारपूस करण्याचा प्रयत्न केल्यानंतर घरातील व्यक्तींनी निघून पलायन केले होते. याविषयी वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शुक्रवारी पोलिसांनी त्या घरामध्ये जावून पाहणी केली. तेथील छायाचित्रेही घेतली आहेत. घरातील सदस्यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलिसांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, घराच्या मूळ मालकाचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले. ते आजारी असल्याने घरातच शौचास बसावे लागत होते. सर्व कचरा बाहेर जावून टाकणे दाट लोकवस्तीमुळे शक्य नसल्याने तो खड्डा करून त्यामध्ये टाकला जात होता, असे सांगितले आहे. पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडूनही माहिती घेतली आहे. घरामधील वास्तव स्थितीची छायाचित्रे घेण्यात आली आहेत. याविषयी वस्तुस्थिती तपासली असून या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. घरातील सदस्यांनी खड्ड्याविषयी दिलेले स्पष्टीकरण कितपत खरे आहे याचीही माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.(प्रतिनिधी)