शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी मुंबईतील विवाहितेचा अमानुष छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 00:27 IST

लग्नात हुंडा न आणल्याच्या कारणावरून विवाहितेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : लग्नात हुंडा न आणल्याच्या कारणावरून विवाहितेला दोनदा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या कुलाबा परिसरात हा प्रकार घडला असून सासरच्या त्रासाला कंटाळून कोपरखैरणेत आल्यानंतर विवाहितेने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यादरम्यान पहिल्या पत्नीची माहिती लपवून पतीने तिच्यासोबत दुसरे लग्न केल्याचीही बाब उघड झाली.कुलाबा येथील रॉबर्ट हाउस कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू वसाहतीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी मागील चार वर्षांत पती व सासूने अमानुष अत्याचार केल्याची तक्रार पीडित विवाहितेने कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पती शरद मणारी व सासू सुभाषिनी मणारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद याचे पहिले लग्न झालेले असून तिच्यापासून घटस्फोट घेतलेला नाही. त्यानंतरही पहिल्या लग्नाची माहिती लपवून त्याने पीडित महिलेसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्यांनी पत्नीचा मानसिक तसेच शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. माहेरून स्त्रीधन आणले नाहीस त्यामुळे गरोदर राहायचे नाही अशी सक्ती तिच्यावर लादली गेली होती. त्यानंतरही पतीकडून ती दोनदा गरोदर राहिली असता, आवश्यक उपचारांकडे व देखभालीकडे दुर्लक्ष करून दोन्ही वेळेस गर्भपात होण्यास तिला भाग पाडले गेले. यामुळे पीडितेच्या वडिलांनी सासरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. अखेर पती व सासूकडून होणारा अमानुष छळ व गलिच्छ भाषेतील शिव्या याला कंटाळून पीडितेने त्यांच्यापासून स्वत:ची सुटका करून घेतली. दरम्यान त्या कोपरखैरणेत रहायला आल्या असता, त्यांनी घडलेल्या संपूर्ण प्रकाराची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानुसार पती व सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच लग्नात हुंड्याच्या स्वरूपात घेतलेल्या वस्तू व दागिन्यांचा परस्पर अपहार केल्याचीही तक्रार दाखल करण्यात आली आहे.