शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

By नामदेव मोरे | Updated: April 29, 2024 18:50 IST

फरसबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांची तेजी

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्यभर वाढलेल्या तापमानाचा भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घसरली असून, बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले असून, दुपारी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. बाजार समितीमध्ये सोमवारी ५३२ वाहनांमधून २०७९ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, यामध्ये चार लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.

मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाल्याचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर ९० ते १०० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबीचे दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. फ्लॉवरचे दर १२ ते १६ वरून १४ ते १८, घेवडा ३२ ते ४० वरून ३५ ते ४५ रुपये किलोंवर पोहोचले आहेत. शेवगा शेंगही २४ ते ३० वरून २५ ते ३५ रुपयांवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर, मेथी, पालक यांचे दरही वाढले आहेत. मुळा जवळपास मार्केटमधून गायब झाला आहे.

दुपारी भाजीपाल्याची दुकाने बंद

नवी मुंबईतील तापमानही ४२ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे शहरातील सर्व मंडईमधील भाजीपाल्याची दुकाने दुपारी १२ नंतर सायंकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. माल खराब होऊ नये यासाठी दुकानातील तापमान कमी ठेवण्यासाठी भाजीपाल्यावर पाण्याचा शिडकाव करावा लागत आहे. यानंतरही माल खराब होत असून, वजनावरही परिणाम होत आहे.

  • यांचे दर कडाडले- फरसबी, फ्लॉवर, घेवडा, काकडी, शेवगा शेंग, कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, वाटाणा.
  • या भाज्या नियंत्रणात- घेवडा, गवार, कारली, ढोबळी मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची
  • होलसेल व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव

भाजी - होलसेल - किरकोळ मार्केट

फरसबी - ९० ते १०० - १६० ते २००घेवडा - ३५ ते ४५ - १०० ते १२०काकडी - १६ ते २४ - ५० ते ६०शेवगा शेंग २५ ते ३५ - ६० ते ८०वाटाणा ९० ते ११० - १०० ते १२०

  • पालेभाज्यांचे प्रतीजुडी दर

भाजी- होलसेल - किरकोळ मार्केट

कोथिंबीर १४ ते १८ - २५ ते ३०मेथी १४ ते १८ - २५ ते ३०पालक १० ते १२ - २० ते २५

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला सुकण्याचे व खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात तेजीचे वातावरण आहे.-स्वप्निल घाग, भाजीपाला व्यापारी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई