शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी लहान मुलांसाठी पुढे यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 02:06 IST

सुनील गावसकर यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : जन्मजात हृदयरोग असलेल्या गरीब मुलांना शस्त्रक्रिया परवडणारी नसते. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. अशा मुलांच्या उपचाराकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तींनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याची गरज असल्याचे मत क्रिकेटपटू सुनील  गावसकर यांनी मांडले. द्विशतक केल्यावर जसा आनंद होतो, त्याहून ज्या बालकांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाल्या त्या पालक आणि बालकांचा आनंदमयी चेहरा पाहून होत  गावसकर यांनी सांगितले.

कोविड काळात हृदयविकाराने त्रस्त असणाऱ्या १५० मुलांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया खारघर येथील श्री सत्यसाई संजीवनी रुग्णालयात करण्यात आल्या. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बुधवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गावस्कर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर श्री सत्यसाई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सी. श्रीनिवासन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे जिल्हा गव्हर्नर सुनील मेहरा,अध्यक्ष नितीन मेहता आदी उपस्थित होते. यावेळी शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांचा क्रिकेटपटू सुनील  गावसकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी रोटरी क्लब बॉम्बे एअरपोर्ट यांच्या वतीने दोन कोटी १७ लाख रुपये अर्थसाहाय्य करण्यात आले. त्यामुळे मुलांना एक नवीन आयुष्य मिळाले. ज्या बालकांना हृदयविकाराचा आजार असेल अशा पालकांनी रोटरी क्लब बॉम्बे एअरपोर्टला संपर्क साधल्यास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टचे जिल्हा गव्हर्नर सुनील मेहरा यांनी यावेळी सांगितले.

ऑगस्ट ते जानेवारी दरम्यान ६८ मुलांवर शस्त्रक्रिया पार पडल्या. मे महिन्यापर्यंत शंभर बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, येत्या वर्षात ७५० बालकांची शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे.- सी. श्रीनिवासन, अध्यक्ष, श्री सत्य साई हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट,

टॅग्स :Sunil Gavaskarसुनील गावसकरNavi Mumbaiनवी मुंबई