शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय आंबा जगात भारी! मुंबईतून अमेरिकेला ५६७ टन निर्यात, ४० पेक्षा जास्त देशांना लागली गोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 07:10 IST

फळांच्या राजाची चव जगभरातील ग्राहकांना आवडू लागली आहे. भारतामधील विविध शहरांमधून प्रत्येक वर्षी आंबा निर्यात केला जात आहे.

- नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : भारतीय आंब्याला जगभरातून मागणी वाढत आहे. यावर्षीही ४० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जात आहे. पणन मंडळाच्या नवी मुंबईमधील केंद्रातून आतापर्यंत अमेरिकेला ५६७ टन निर्यात झाली आहे. यूकेला १,०६१ टन व जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरियासह युरोपभर आंबे पाठविले जात असून यासाठी विशेष निर्जंतुकीकरण प्रकल्पही उभारला आहे. 

फळांच्या राजाची चव जगभरातील ग्राहकांना आवडू लागली आहे. भारतामधील विविध शहरांमधून प्रत्येक वर्षी आंबा निर्यात केला जात आहे. २०२२ - २३ मध्ये २२,९६३ टन आंब्याची ४० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात झाली होती. आंबा निर्यातीमधून ३७८ कोटी रुपयांची उलाढाल झाली हाेती. अमेरिका, युरोप, युके व इतर काही देशांमध्ये निर्यात करताना आंब्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करावी लागते. यासाठी नवी मुंबई, लासलगाव, अहमदाबाद व बेंगळूरू येथे विशेष निर्यात सुविधा केंद्र सुरू केली आहेत. 

भारतीय आंब्याला अमेरिकेमध्येही मागणी वाढत आहे. २०२० - २१ मध्ये फक्त १.४५ टन आंबा अमेरिकेला निर्यात केला होता. २०२२ - २३ मध्ये हा अकडा ८१३ टन झाला आहे. यावर्षी फक्त नवी मुंबईच्या केंद्रातून आतापर्यंत ५६७ टन आंबा निर्यात झाला आहे. आतापर्यंत आस्ट्रेलियाला १६.५४ टन, युकेला १०६१ टन, युरोपीय देशांमध्ये ९२ टन, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंडमध्ये ५४.५ टन आंबा पणन मंडळाच्या केंद्रातून निर्यात केला जात आहे. पणन संचालक सुधीर तुंगार व इतर अधिकाऱ्यांनी निर्यात वृद्धीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

अमेरिका, युरोपियन देशांसह विविध देशांमध्ये आंबा निर्यात केला जात आहे. प्रत्येक देशाच्या नियमावलींचे पालन करून व आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जात आहे. आंब्यावर व्हॉट वॉटर व व्हीएचटी ट्रिटमेंट केली जाते. - सतीश वाघमोडे, सह-सरव्यवस्थापक, निर्यात सुविधा केंद्र 

टॅग्स :Mangoआंबा