शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

सिडकोमध्ये वाढले लाचखोरीचे प्रमाण; सहा महिन्यांत तीन अधिकाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 23:19 IST

राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोतील कथित भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाºया सिडकोतील कथित भ्रष्टाचार सर्वश्रुत आहे. या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सिडकोच्या वतीने विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यानंतरही भ्रष्टाचाराच्या घटनांना आळा बसू शकला नाही. कारण सहा महिन्यांत विविध प्रकरणांत तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे संबंधित विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सिडकोतील भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक समितीही गठित केल्या आहेत. या समित्यांनी काय चौकशी केली, कोणावर काय कारवाई केली, हा विषय गुलदस्त्यातच आहे. असे असले तरी सध्या सिडकोच्या विविध विभागांत बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी संबंधित विभागाची कसरत होत आहे. मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील नियंत्रक पी. बी. राजपूत, त्यांचे सहकारी खडसे आणि गेल्या आठवड्यात सहायक वसाहत अधिकारी सागर तापडिया यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तर आर. आर. पाटील या कर्मचाºयाच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या दीड दशकात नवी मुंबईतील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे भूखंडांचे श्रीखंड लाटणाºया प्रवृत्तींनी अधिकारी व कर्मचाºयांशी अर्थपूर्ण युती करून सिडकोत उच्छाद मांडला आहे. विविध विभागात पोसलेला हा भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून सिडकोत दक्षता विभागाची स्थापना केली.

या विभागाच्या प्रमुखपदी पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांची नेमणूक केली. त्यानुसार पाच वर्षांपूर्वी प्रज्ञा सरवदे यांची सिडकोच्या पहिल्या मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे काही काळ सिडकोतील भ्रष्टाचाराच्या घटनांना आळा बसला. सध्या निसार तांबोळी हे सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून, म्हणजेच मागील सहा महिन्यांत लाचखोरीची तीन प्रकरणे उजेडात आली आहेत.

विशेष म्हणजे, कारवाईच्या जाळ्यात अडकलेले तिन्ही अधिकारी तरुण आहेत. त्यावरून सिडकोत दाखल होणाºया अधिकारी व कर्मचाºयांची मानसिकता विविध मार्गाने केवळ पैसे कमविणे इतकीच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सिडकोतील नव्या दमाच्या अधिकाºयांना महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी देऊ नये, असा मतप्रवाह सिडकोच्या जुन्या व वरिष्ठ अधिकारी वर्गातून पाहवयास मिळत आहे.

तक्रारींचा खच

भ्रष्टाचाराविषयक अनेक तक्रारी सिडकोच्या मुख्य दक्षता विभागाकडे पडून आहेत. यात विविध विभागातील जुन्या व नवीन अधिकारी-कर्मचाºयांचा समावेश आहे. मुख्य दक्षता अधिकारी या प्रकरणांचा निपटारा करीत आहे. अनेक प्रकरणांत विभागीय चौकशी सुरू आहे. यावरून सिडकोतील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढीस लागल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबई