शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

दागिने चोरीच्या गुन्ह्यांत वाढ

By admin | Updated: May 6, 2015 23:21 IST

जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जयंत धुळप,  अलिबागजिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक पोलिसांना या सोनेचोरांना गजाआड करण्यात अद्याप यश येत नसल्याने जनसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अलिबाग बस आगारात आपल्या पतीसह एसटी बसमध्ये चढत असताना संजना सदाशिव बलकवडे यांच्या पर्सच्या मधल्या खणात ठेवलेला सोन्याचे दागिने असलेला डबा चोरट्याने मोठ्या शिताफीने चोरून लंपास केला आहे. चोरीस गेलेल्या या सोन्याच्या दागिन्यांची किंमत एकूण ४ लाख ७९ हजार ५०० रुपये असल्याची माहिती अलिबाग पोलिसांनी दिली आहे.गेल्या शनिवारी मध्यरात्री पेण तालुक्यातील वरेडी गावातील सुरेखा लहू कोळी यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरातील कपाट फोडून त्यातील ३४ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याप्रकरणी दादर सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.डोंबिवलीतील भाविका बळीराम मालोरे या १९ एप्रिल रोजी खारपाडा येथे सोन्याचे दागिने असलेली सुटकेस रस्त्याच्या बाजूला विसरून गेल्या होत्या. यातील २ लाख ५ हजार ५०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम यासह चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी कर्जत, भिसेगाव ते लोधिवली अशा प्रवासादरम्यान रिस मोहोपाडा येथील गृहिणी दीपाली संतोष भंडारकर यांच्याकडील कापडी पिशवी मोठ्या शिताफीने कापून त्यातील तब्बल ४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तीन चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरूच> नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये सोनसाखळी चोरांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केला आहे. चोवीस तासांमध्ये ८ महिलांच्या गळ्यातील तब्बल ३ लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावण्यात आले असून यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सीबीडीमध्ये मंगळवारी दुपारी एका महिलेस धक्का देऊन चोरट्यांनी पाडले आणि तिच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावण्यात आली. चोरटे सोनसाखळी हिसकावण्यासाठी महिलांवर हल्लाही करू लागल्यामुळे महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. > नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत. ऐरोली सेक्टर-१० मध्ये राहणाऱ्या स्मिता बोरकर ही महिला मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. सीबीडीमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिजाबाई पाटील या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. > नेरूळ सेक्टर-२४ मध्ये राहणाऱ्या सुशीला बंडगर यांच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली आहे. पनवेलमधील तक्का गाव येथे राहणाऱ्या मधुमती प्रवीणकुमार या महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेली आहे. बुधवारी सकाळी तीन घटना घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. > वाशी सेक्टर-१६ मध्ये राहणाऱ्या अश्विनी घरत या वाशी बसडेपोतून जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. घणसोलीमध्ये राहणाऱ्या सुलभा जाधव या रोडने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. > कोपरखैरणे सेक्टर-१० मधून पायी जाताना बागाम्मीमनमी या महिलेच्या गळ्यातील २७ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेली. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल आठ घटना घडल्या आहेत. यामध्ये सात महिला व एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. सोनसाखळी चोरट्यांंना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. > खैरणे एमआयडीसीमधील रियल व्हॅली कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांना चार जणांनी चाकूचा धाक दाखवून कंपनीमधील १ लाख रुपये किमतीचे ५ मोठे मशिनचे पार्ट हिसकावून नेले आहेत. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या चेन स्रॅचिंगमुळे महिलांना घराबाहेर पडणे असुरक्षित वाटत आहे.